Wimbledon 2025 Final : अंत एका काळाचा! सहा वर्षांनंतर ज्योकोविचविना विम्बल्डनची फायनल, विजेतेपदासाठी यानिक सिनर अन् कार्लोस अल्काराज भिडणार
Jannik Sinner VS Carlos Alcaraz Wimbledon 2025 final : इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिनरने सरळ सेट्समध्ये हा सामना जिंकून पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Jannik Sinner beats Novak Djokovic : विम्बल्डन 2025 मधील पुरुष टेनिसच्या उपांत्य फेरीत इटलीच्या यानिक सिनरने सात वेळा विजेता नोव्हाक ज्योकोविचला 6-3, 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये हरवले. हा सामना शुक्रवारी पार पडला. सात वेळचा विजेता नोव्हाक ज्योकोविचचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिनरने सरळ सेट्समध्ये हा सामना जिंकून पहिल्यांदाच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
Carlos Alcaraz. Jannik Sinner.
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2025
The gentlemen's singles final will be box office 🍿#Wimbledon pic.twitter.com/Y551cJsLSb
आता फायनलमध्ये सिनरचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी होणार आहे. अल्काराजने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जला 6-4, 5-7, 6-3, 7-6(6) अशा चार सेटमध्ये पराभूत करत फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
2012 नंतर पहिल्यांदाच ज्योकोविचला उपांत्य फेरीत पराभव!
सिनरने गेल्या अनेक वर्षांपासून विम्बल्डनवर असलेल्या ज्योकोविचच्या वर्चस्वालाही धक्का दिला. कारण 2012 नंतर पहिल्यांदाच ज्योकोविचला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्या वेळी तो रॉजर फेडररकडून हरला होता. तसेच, अल्काराजकडून सलग दोन फायनल्स (2023, 2024) गमावलेल्या ज्योकोविचसाठी ही हार आणखी जखम करणारी ठरली.
Jannik Sinner becomes the second player, after Carlos Alcaraz, to beat Novak Djokovic at #Wimbledon since 2018 pic.twitter.com/oFz9RjWRsS
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2025
फ्रेंच ओपनच्या फायनलची पुनरावृत्ती
यानिक सिनरने पहिल्यांदाच विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. त्याच्या विजयानंतर आता दोन्ही मानांकित क्रमांक 1 आणि 2 असलेले सिनर व अल्काराज यांच्यात चार आठवडे आधीच झालेल्या फ्रेंच ओपनच्या फायनलची पुनरावृत्ती होणार आहे. अल्काराजने आतापर्यंत ग्रँड स्लॅमच्या पाचही फायनल्स जिंकलेले आहेत, तर सिनरकडे तीन मेजर ट्रॉफी आहेत. सध्या अल्काराज 24 सलग सामन्यांपासून अनिर्णित विजयी मालिकेत आहे.
It's a maiden #Wimbledon final for Jannik Sinner 💥
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2025
The Italian defeats Novak Djokovic with a dazzling 6-3, 6-3, 6-4 victory to line up a Sunday afternoon meeting with Carlos Alcaraz 🤝
Just world No.1 doing world No.1 things 😅 pic.twitter.com/jObVzUdMqA
यंदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्काराज आणि सिनर या दोन युवा स्टार्समधील सामना भारतीय वेळेनुसार रविवारला होणार आहे. अल्काराज सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन जिंकण्याच्या वाटेवर आहे, तर सिनर आपल्या चौथ्या ग्रँड स्लॅम फायनलमध्ये विजेतेपदाचा सन्मान मिळवण्याचा निर्धार करेल.
हे ही वाचा -
























