एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईशान किशनचं वादळी शतक, वानखेडेवर अनोख्या टी-20 चा थरार
सलामीवीर ईशान किशनच्या धडाकेबाज खेळीने उपस्थित मुंबईकरांची मनं जिंकली. अवघ्या 42 चेंडूत आपलं शतक ठोकणाऱ्या इशानने 49 चेंडूत नाबाद 124 धावांची झंझावाती इनिंग खेळली. ज्याला 9 चौकार आणि 12 षटकारांचा साज होता.
मुंबई : युवराज सिंहच्या नो हॉकिंग इलेव्हनचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत सुरेश रैनाच्या रोडसेफ्टी इलेव्हनने हा सामना आपल्या खिशात घातला. सलामीवीर ईशान किशनच्या धडाकेबाज खेळीने उपस्थित मुंबईकरांची मनं जिंकली. अवघ्या 42 चेंडूत आपलं शतक ठोकणाऱ्या इशानने 49 चेंडूत नाबाद 124 धावांची झंझावाती इनिंग खेळली. ज्याला 9 चौकार आणि 12 षटकारांचा साज होता. तर दुसऱ्या टोकावरून शिखर धवनने 68 धावा करून त्याला छान साथ दिली.
नाणेफेक जिंकून रैनाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. के एल राहुलच्या दमदार अर्धशतकाने हाँकिंग इलेव्हनला वेगवान सुरूवात करून दिली. राहुलच्या 31 चेंडूत 56 धावांचा अपवाद वगळता कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र युवराज सिंह, दिनेश कार्तिक आणि शुभम गिलने छोट्या-छोट्या, पण वेगवान भागीदाऱ्या रचून आपल्या टिमला 200 धावांची वेस ओलांडून दिली. रोडसेफ्टी इलेव्हनसाठी विनय कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
आयपीएलचा थरार सुरू होण्याआधी शनिवारी मुंबईच्या क्रिकेटरसिकांनी टी-20 क्रिकेटचा थरार अनुभवला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या हॉर्न नॉट ओके प्लीज कप या चॅरीटेबल टी-20 सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
विनाकरण हाँकिंगमुळे वाढत चाललेलं ध्वनी प्रदूषण आणि बेदरकार ड्रायव्हिंगमुळे होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी हे या सामन्याच्या आयोजनामागचं मुख्य उद्दीष्ट होतं. राज्य सरकारच्या पुढाकारने आयोजित करण्यात आलेल्या सामन्याची सुरूवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत झाली.
या सामन्यात युवराजसिंग, हरभजनसिंग, शिखर धवन, दिनेश कार्तिक, जसप्रित बुमरा, विनय कुमार, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या या टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्ससह अनेक युवा खेळाडूंचा सहभाग होता. त्यामुळे मुंबईकरांनीही मोठ्या संख्येने या सामन्याला हजेरी लावली होती.
सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बांग्लादेशविरूद्ध टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकने माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 'त्या' विजयानंतरचे 2 दिवस त्या विजयाचा आणि त्या खेळीचा फिव्हर होता. मात्र आता सारं काही नॉर्मल असल्याचं कार्तिकनं म्हटलं.
यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये कार्तिकच्या खांद्यावर कोलकाता नाईट रायडर्सच्या नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली आहे. या जबाबदारीकडे एक नवं आव्हान म्हणून पाहत यंदाच्या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे भर देण्याचं कार्तिकने म्हटलं आहे.
महेंद्रसिंग धोनीसारख्या कर्तृत्त्ववान खेळाडूच्या जागी विकेटकीपर बॅट्समन म्हणून संधी मिळणं कठीणच होत. म्हणून गेल्या काही वर्षात एक परिपूर्ण फलंदाज होण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याची कबुली यावेळी कार्तिकने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement