एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इरफान पठाणने दिलेलं 'चॅलेंज' युसूफ पठाणने स्वीकारलं!
युसूफने 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून खेळणाऱ्या लोकेश राहुलने आयपीएल 11 मध्ये धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं. राहुलने आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या युसूफ पठाणचा विक्रम मोडला.
यानंतर युसूफचा धाकटा भाऊ इरफान पठाणने त्याला एक चॅलेंज दिलं असून त्याने ते स्वीकारलं. युसूफने 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
इरफानने ट्विटरवर लोकेश राहुलचं कौतुक करताना लिहिलं की, “राहुल, जबरदस्त खेळी. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक. यूसुफ भाई, आता 13 चेंडूत प्रयत्न करणार?”
यावर युसूफने अतिशय प्रेमाने उत्तर दिलं. “इंशाअल्लाह, तुझ्यासाठी 13 चेंडूतही अर्धशतक करण्याचा प्रयत्न करेन. केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. सोबतच तुला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकून फार छान वाटतं. नवी भूमिका तू एन्जॉय करत असशील, अशी आशा आहे.”KL Rahul 👏👏 outstanding innings. Fastest 50 in the ipl @iamyusufpathan bro let’s try for 13 balls now ?
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 8, 2018
Tere liye 13-ball me bhi 50 bana neka try karenge Insha Allah bhai and well played @klrahul11 . Also, it's lovely to hear you in the commentary box @IrfanPathan hope you're enjoying the new role. @IPL https://t.co/SclybmZbt1
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) April 9, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement