WPL 2023 : यूपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, मुंबई इंडियन्स करणार गोलंदाजी
UPW-W vs MI-W : मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन्ही महिला संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर सामना सुरु होत आहे.
![WPL 2023 : यूपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, मुंबई इंडियन्स करणार गोलंदाजी WPL 2023: UPW-W vs MI-W match Live UPW Won toss and elected bat first know details WPL 2023 : यूपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, मुंबई इंडियन्स करणार गोलंदाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/12/a26489e3ae3e29cdf8d909cbaa2165d21678627561824224_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WPL 2023, MI vs UPW :महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स (UPW vs MI) या संघांमध्ये सामना होत आहे. यूपी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यूपी संघाची मदार अलिसा हेलीवर असणार असून मुंबईची कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौरवर आहे.
यूपीचा संघ मुंबईची विजयी घोडदौड रोखणार का?
महिलांच्या आयपीएल 2023 च्या मोसमात आतापर्यंत एकही सामना मुंबईचा संघ पराभूत झालेला नाही. तीनपैकी तीनही सामन्यात विजय मिळवणाऱ्या मुंबईचा स्पर्धेतील हा चौथा सामना आहे. दुसरीकडे यूपी संघाने देखील तीन सामने खेळले असून त्यातील दोन जिंकले आहेत. त्यामुळे आज यूपी आपला तिसरा विजय नोंदवून मुंबईची विजयी साखळी तोडणार का? हे पाहावं लागेल.
दोन्ही संघानी अंतिम 11 मध्ये केले बदल
दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता दोघांनी प्रत्येकी एक बदल संघात केला आहे. यूपी संघाने शबनीम इस्माईलला हॅरिसच्या जागी संधी दिली आहे. तर धारा गुजर पुजाच्या जागी मुंबई इंडियन्समधून आज खेळत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 पाहूया...
कसे आहेत दोन्ही संघ?
यूपी वॉरियर्सचे अंतिम 11: देविका वैद्य, अॅलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टोन, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड
मुंबई इंडियन्सचे अंतिम 11 : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), धारा गुजर, अमेलिया केर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन):
कधी, कुठे पाहाल सामना?
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या महिला संघांमध्ये होणारा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नुकतीच नाणेफेक झाली आहे. दरम्यान या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)