IPL 2023 : केन विल्यमसनला गुजरात टायटन्स खरेदी करणार? हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर
Kane Williamson : आयपीएल 2023 पूर्वीच सनरायजर्स हैदराबाद संघाने त्यांचा कर्णधार केन विल्यमसनला रिलीज केलं आहे.
Hardik Pandya on Kane : जागतिक क्रिकेटमधील एक स्टार कर्णधार असणारा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याला आयपीएल 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) रिलीज केलं आहे. मंगळवारी फ्रँचायझीने जारी केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादीत 12 खेळाडूंपैकी तो एक होता. दरम्यान आता तो हैदराबादमध्ये नसल्याने कोणत्या संघातून आय़पीएल खेळणार या चर्चांना उधाण आलं असून आयपीएल 2022 चा विजेता संघ गुजरात टायटन्स या डावखुऱ्या स्टार फलंदाजाला विकत घेणार का? असा प्रश्न त्यांचा कॅप्टन हार्दिकला विचारला असता त्याने यावर खास उत्तर दिलं आहे.
हार्दिक सध्या टीम इंडिसोबत न्यूझीलंड दौऱ्यावर असून तो संघाचा कर्णधार आहे. यावेळी त्याला केनबद्दल प्रश्न विचारला असता त्याने यावर जास्त न बोलण्याचा निर्णय घेतला. तसंच तो म्हणाला, "मला माहित नाही, तसंच आयपीएल अजून दूर आहे, त्यामुळे आताच विचार केलेला नाही. तर विल्यमसनला आयपीएल लिलावात निवडले जाईल का? असे विचारले असता तो म्हणाला, "हो, का नाही, पण सध्या मी भारताकडून खेळत आहे." असं उत्तर पांड्याने दिलं.
आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून खेळलेल्या केन विल्यमसनने त्या हंगामात संघासाठी 13 सामने खेळले आणि 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 93.51 इतकाच होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2022 मध्ये 14 पैकी केवळ 6 सामनेच जिंकले होते. ज्यामुळे आयपीएल संपताना संघ गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात केनला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र, तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या साऱ्या गोष्टींचा विचार करुनच फ्रँचायझीने विल्यमसनला सोडण्याचा निर्णय घेतला असावा.
केन झाला भावूक
हैदराबाद संघापासून असं अचानक वेगळं व्हावं लागल्यामुळं केनही निराश झाला असून त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हैदराबाद संघाचे आभार मानणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विल्यमसनने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हैदराबाद संघ, माझे टीममेट्स, स्टाफ आणि संपूर्ण ऑरेंज आर्मीसाठी, हे 8 वर्षे मजेदार बनवल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. हा संघ आणि हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच खास असेल.'' या पोस्टसोबतच त्याने आयपीएलमधील काही खास फोटोही शेअर केले आहेत.
हे देखील वाचा-