एक्स्प्लोर

IPL 2022, RCB vs MI : आयपीएल सामन्यादरम्यान विराटला हस्तांदोलन करण पडलं महाग, पोलिसांनी केली अटक

शनिवारी पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यावेळी एका क्रिकेटप्रेमीने थेट मैदानात उडी घेत विराटकडे धाव घेतली.

RCB vs MI : शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर (MCA Ground) आयपीएलचा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (MI vs RCB) सामना पार पडला. या सामन्यादरम्यान मैदानावर पळत जाऊन विराट कोहलीला हात मिळवणं एका चाहत्याला चांगलच महागात पडलं आहे. सामन्यावेळी मैदानात घुसल्यामुळे आता त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

शनिवारी पुण्यातील गहूंजेच्या एमसीए मैदानावर मैदानावर आयपीएलचा सामना सुरू होता. भारतीय क्रिकेट संघाचे आजी-माजी कर्णधारांसह जगातील सर्वोत्तम खेळाडू मैदानात आमने-सामने भिडत होते. तेंव्हाच 26 वर्षाच्या दशरथ जाधवला मैदानात जाण्याचा मोह आवरला नाही. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची नजर चुकवत तो अचानकपणे मैदानात शिरला. पळत जाऊन आधी विराट कोहलीला हस्तांदोलन करण्याच्या हेतूने मुठ्ठी बांधून विराटच्या मुठ्ठीला स्पर्श केला. ताब्यात घेण्यासाठी मागे सुरक्षा रक्षक आणि पोलीस होतेच. पण चपळाईने तो रोहित शर्माकडे वळाला, पण तेव्हाच यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मैदानाबाहेर आणत असताना देखील दशरथने वाद घातले. इथंच न थांबता तो पोलिसांच्या अंगावर ही तो धावून गेला. त्यामुळे त्याला अटक करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोह न आवरल्याने खावी लागणार तुरुंगाची हवा

इतके आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू पाहिल्यावर पाहून, मैदानात सामना पाहायला येणाऱ्या प्रत्येकाला त्या खेळाडूंना भेटायचं, त्याच्यासोबत फोटो काढायचा मोह नक्कीच आवरता येत नाही. त्यातूनच असे नको ते वेडं धाडस करणारे थेट मैदानात घुसतात. अशा प्रसंगामुळे खेळात काही वेळाचा व्यत्यय येतो. क्षणार्धात फेमस होण्यासाठी हे असे कृत्य केले जातात, पण यातून स्वतःची नाहक बदनामी होते, याचा मात्र त्यांना विसर पडतो. आता दशरथवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक करण्यात आलीये. त्यामुळे त्याला काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Embed widget