IPL 2022: पंजाबच्या संघाला मोठा धक्का! फलंदाज प्रशिक्षक वसिम जाफरचा राजीनामा
IPL 2022: आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction) पंजाब किंग्ज (Panjab Kings) फ्रँचायझीला मोठा धक्का बसलाय.
IPL 2022: आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction) पंजाब किंग्ज (Panjab Kings) फ्रँचायझीला मोठा धक्का बसलाय. पंजाबच्या संघाचे फलंदाज प्रशिक्षक वसीम जाफरनं (Wasim Jaffer) आपल्या पदाचा राजीनाम दिलाय. जाफरनं आपल्या राजीनाम्याची ट्विटरवर घोषणा केलीय. सध्या आस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डॅमियन राईट गोलंदाजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून पंजाबच्या संघाची जबाबदारी संभाळत आहेत. जाफर 2019 मध्ये पंजाब किंग्जमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला होता.
जाफरने पंजाब किंग्जच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मजेशीर पोस्टद्वारे दिली. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटातील 'अच्छा चला हूँ, दुआओं में याद रखना' या गाण्यातील फोटो पोस्ट करून त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. ट्विटमध्ये जाफरने अनिल कुंबळे आणि संपूर्ण टीमला आयपीएल 2022 साठी शुभेच्छा दिल्या.
ट्वीट-
आयपीएलच्या मागील हंगामात पंजाबच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाबच्या संघानं मंयक अग्रवालला 12 कोटी आणि अर्शदीप सिंहला 4 कोटीत रिटेन केलंय. सद्या पंजाबच्या संघाकडं 72 कोटी शिल्लक आहे. जे इतर फ्रँचायझीपेक्षा सर्वाधिक आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकूण संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
ट्वीट-
वसीन जाफरच्या ट्विटवर राजस्थान रॉयल्स भन्नाट प्रतिक्रिया दिलीय. 'कुठे माझी नोकरी तर...', असं राजस्थान रॉयल्स त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वसीम सोशल मीडियावर अधिक सक्रीय असल्यामुळं राजस्थान रॉयल्सकडून असं ट्विट करण्यात आलंय. या ट्विटचा अर्थ असा होता की, वसीम जाफरनं फलंदाजी प्रशिक्षक पद सोडल्यानंतर ते राजस्थान रॉयल्सचं सोशल मीडिया अकाऊंट हॅंडल करण्याची जबाबादारी हातात घेऊ नये.
हे देखील वाचा-
- IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी
- IPL auction 2022 : आयपीएल लिलावात 'या' 8 भारतीय फलंदाजांवर असेल सर्वांची नजर
- IPL auction 2022 : कोणत्या संघाच्या ताफ्यात कोणते शिलेदार? कुणाच्या बटव्यात किती रक्कम शिल्लक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha