"प्रत्येकाला खूश करणं अशक्य हे धोनीकडून शिकलो..."; विराट कोहलीच्या इंटकव्यूची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
Virat Kohli And MS Dhoni: तुम्ही प्रत्येक वेळी सर्वांना खुश करू शकत नाही, हे मी धोनीकडून शिकलो, असं विराट कोहलीनं सांगितलं आहे.
Virat Kohli And MS Dhoni: विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. या मोसमातील काही सामन्यांमध्ये त्यानं फाफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत आरसीबीची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेतली आहे. यंदाच्या मोसमात विराटची तुफानी खेळी आणि त्याचे मैदानावरचे राडे यांमुळे तो चर्चेत आहेच. पण त्यासोबतच विराट सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका क्लिपमुळे चर्चेत आहे. विराट कोहलीच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मला महेंद्रसिंह धोनीकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, तुम्ही सर्वांना खूश करू शकत नाही, असं विराट म्हणतोय.
विराट कोहलीनं स्वतः सोशल मीडियावर त्याच्या एका मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अनेक गोष्टींबद्दल बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओमध्ये विराटनं धोनीबाबत वक्तव्य केलं आहे. विराट म्हणाला की, "एक गोष्ट मी एमएस आणि इतर लोकांकडून शिकलोय, ज्यांनी टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवलं आहे, तुम्ही प्रत्येक वेळी सर्वांना खुश करू शकत नाही."
It’s a long road to the top but the greatest lessons are learnt when you get knocked down and get back up.
— Virat Kohli (@imVkohli) May 11, 2023
Let There Be Sport with @pumacricket, now streaming on @DisneyPlusHS. #LetThereBeSport #ad pic.twitter.com/dymvO8G4HK
धोनी कर्णधार असतानाच विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, जेव्हा महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. यानंतर धोनीनं 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि विराट कोहलीची भारतीय कसोटी संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2017 मध्ये विराट कोहली T20 आणि ODI फॉरमॅटमध्येही टीम इंडियाचा कर्णधार बनला.
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा तिनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. विराट कोहलीनं 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कर्णधार पद भूषवलं होतं. विराट कोहली आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्यानं एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे, ज्यामध्ये टीम इंडियानं 40 कसोटी सामने जिंकले आहेत.