Virat Kohli : विराट कोहली झाला 'पुष्पा', मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीचा व्हिडीओ व्हायरल
Virat Kohli, IPL 2022 : क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली भलेही अपयशी ठरत असला तरीही मैदानाबाहेर जलवा कायम आहे.
Virat Kohli, IPL 2022 : मागील काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट शांतच आहे. त्याच्यावर फॉर्म रुसला आहे. आयपीएलमध्येही विराट कोहलीचा खराब फॉर्म सुरुच आहे. रवी शास्त्री यांच्यासह अनेक दिग्गजांनी विराट कोहलीला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली भलेही अपयशी ठरत असला तरीही मैदानाबाहेर जलवा कायम आहे. विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपाटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याचे काही फोटोही आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचं नुकतेच लग्न झाले. या लग्नातील एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराटसह खेळाडूंनी ठुमके लगावले आहेत. ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीचं 27 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. मॅक्सवेल 18 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकला होता. भारतीय वंशाच्या विनी रमन याच्यासोबत मॅक्सवेलने लग्नगाठ बांधली. ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीला आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली होती. या पार्टीत अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपाटातील गाण्यावर खेळाडूंनी ठुमके लगावले. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय.
पाहा व्हिडीओ
Virat Kohli & Shabaz Dancing 🕺🥳
— Prajwal (@Prajwal2742) April 27, 2022
Virat Looking So Happy ♥️@imVkohli@RcbianOfficial @RCBTweets#ViratKohli #RCB #Shabazahmed #ViratKohli𓃵 pic.twitter.com/UzX1UKV2Bd
लग्नात सामावेश झालेल्या खेळाडूंचे फोटो, पाहा त्यांचा अंदाज
#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #MaxiVins pic.twitter.com/IgksZa3cQ7
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 29, 2022
ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीमध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहचला होता. यावेळी विराट कोहलीने पुष्पा चित्रपाटीत गाण्यावर ठुमके लगावले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय की बायो बबलमध्ये वेडिंग पार्टी....