एक्स्प्लोर

Video : विल जॅक्सचं वादळी शतक, विराट कोहलीचा दिलदारपणा, ग्राऊंडवर जंगी सेलिब्रेशन, आरसीबीचा दणदणीत विजय

Virat Kohli : विराट कोहलीनं नाबाद 70 आणि विल जॅक्सनं नाबाद 100 धावांची खेळी करत संघाला गुजरात टायटन्स विरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला.

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला आहे. आरसीबीनं 9 विकेटनं गुजरात टायटन्सला (Gujarat Titans ) पराभूत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं गुजरात टायटन्सनं विजयासाठी दिलेलं आव्हान 16 ओव्हरमध्ये पार केलं. गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या होत्या. आरसीबीनं विराट कोहली (Virat Kohli) आणि विल जॅक्सच्या (Will Jacks) वादळी खेळीच्या जोरावर 16 ओव्हरमध्येच विजय मिळवला. विल जॅक्सनं 41 बॉलमध्ये 100 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली. आरसीबीनं सलग दुसरा विजय मिळवल्यानं विराट कोहली आनंदी दिसून आला. विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतर विल जॅक्सच्या खेळीबद्दल आनंद व्यक्त केला तर त्याचवेळी स्ट्राइक रेटवरुन टीका करणाऱ्या टीकाकारांना देखील त्यानं प्रत्युत्तर दिलं. 

विल जॅक्सच्या शतकाचं जंगी सेलिब्रेशन

विराट कोहली आणि विल जॅक्सनं आरसीबीला 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. आरसीबीला विजयासाठी एका रनची आवश्यकता असताना विल जॅक्स 94 धावांवर होता. विराट कोहली त्यावेळी नॉन स्ट्राइकर एंडला होता. विल जॅक्सनं सिक्स मारतं शतक पूर्ण केलं आणि आरसीबीला 16 व्या ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला. विराट कोहलीसाठी हा क्षण दुहेरी आनंद देणारा होता. आरसीबीनं स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला होता, त्याच बरोबर विल जॅक्सचं शतक देखील झालं होतं. विल जॅक्सची खेळी नॉन स्ट्राइकर एंडला पाहणं आनंददायी असल्याचं कोहली म्हणाला. 

पाहा व्हिडीओ

विराट कोहलीचं टीकाकारांना प्रत्युत्तर

विराट कोहलीनं त्याच्या स्ट्राइक रेटवरुन टीका करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. स्ट्राइक रेटवरुन आणि स्पिन बॉलिंगला नीट खेळत नाही यावरुन बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते लोक फक्त आकड्यांबाबत बोलतात, मी माझं काम करतोय. आम्ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. गेल्या 15 वर्षांपासून हेच करत आलोय. माझ्या संघासाठी मॅच जिंकत आलोय. तुम्ही मैदानाबाहेर बसून मॅचसंदर्भात बोलणं आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळणं यात फरक असतो, असं विराट कोहली म्हणाला. 

विराट कोहलीच्या 500 धावा पूर्ण

विराट कोहलीनं गुजरात टायटन्स विरुद्ध 70 धावांची खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये 500 धावा केल्या. विराट कोहलीनं 44 बॉलमध्ये 70 धावा केल्य यामध्ये त्यानं  3 सिक्स आणि चार चौकार मारले. 

संबंधित बातम्या 

IPL 2024, RCB vs GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मोहीम फत्ते, जॅक्सनं शतकासह धोनी स्टाईलनं मॅच संपवली, गुजरात टायटन्सला होम ग्राऊंडवर लोळवलं

GT vs RCB : साई सुदर्शनकडून चौकार षटकारांची आतिषबाजी, जे विराटला जमलं ते करुन दाखवलं, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उलटफेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget