(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराट पुन्हा घसरला, धोनी बाद होताच शिवी हासडली? नेटकरी संतापले, व्हिडीओ व्हायरल
IPL 2022, Marathi News : विराट कोहली मैदानावर नेहमीच आक्रमक दिसतो. प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडल्यावर विराटचा जोश आणखीच वाढतो.
IPL 2022, Virat Kohli : विराट कोहली मैदानावर नेहमीच आक्रमक दिसतो. प्रतिस्पर्धी संघाची विकेट पडल्यावर विराटचा जोश आणखीच वाढतो. बुधवारी झालेल्या सामन्यात याची प्रचिती पुन्हा एकदा आली. चेन्नईचा कर्णधार धोनी झेलबाद झाल्यानंतर विराट कोहलीने केलेले सेलेब्रेशन चर्चेचा विषय ठरला आहे. धोनी बाद झाल्यानंतर विराट कोहली जल्लोष करताना दिसला. जल्लोष करताना विराट कोहलीची जीभ घसरल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. धोनी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने शिवी दिल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटलेय. तर काही नेटकऱ्यांनी विराट कोहलीची पाठराखण केली आहे. विराट कोहलीच्या सेलेब्रेशनची पद्धत आहे. नेहमीप्रमाणे विराट कोहलीने सेलेब्रेशन केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा पराभव केला. रोमांचक सामन्यात आरसीबीने धोनीच्या चेन्नईचा 13 धावांनी पराभव केला. सामन्यात धोनी फलंदाजी करताना अपयशी झाला. फक्त दोन धावा काढून धोनी तंबूत परतला. धोनी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने जल्लोष केला. यावेळी त्याची जीभ घसरल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.
पाहा नेटकरी काय म्हणाले?
This Cricket clown🤡 abusing Dhoni still some Mahirat Clowns are supporting this disgusting character 💦 pic.twitter.com/DX1Cm9k7O3
— Bruce Wayne (@Bruce_Wayne_MSD) May 4, 2022
Unacceptable, He is literally abusing indian army personnel Ms Dhoni. 💔
— Sir Dinda⁴⁵ (@SirDindaTweet) May 4, 2022
Always knew this kohli is a anti-national.#CSKvRCB pic.twitter.com/w7uom4VGpg
#CSKvRCB
— Salman Khan fans Page 💯♥️ (@Salman001Fans) May 4, 2022
Virat Kohli Reaction after Dhoni's Wicket 🔥🥵#CSKvRCB pic.twitter.com/5EUJH639vh
दरम्यान, रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे चेन्नईला पराभव पत्करावा लागला. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने अर्धशतक झळकावत एकहाती झुंज दिली. पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर चेन्नई पराभूत झाली आहे. चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यानंतर फाफने कोहलीसोबत सुरुवातही चांगली केली. अर्धशतकी भागिदारी झाल्यानंतर 38 धावांवर फाफ बाद झाला. त्यानंतर कोहलीही 30 धावांवर बाद झाला. रजतने 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण माहिपाल लोमरोरने ठोकलेल्या 42 तुफानी धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात काही षटकार ठोकत दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केलेल्या नाबाद 26 धावा संघाची धावसंख्या 173 पर्यंत नेण्यात महत्त्वाच्या ठरल्या.
कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ
174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली. पण 28 धावा करुन गायकवाड बाद झाला. त्यानंतरही कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या. अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला. त्यामुळे 13 धावांनी अखेर चेन्नईने सामना गमावला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी ही पुरेशी होती. यात हर्षल पटेलने सर्वाधिक 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मॅक्सवेलने दोन तर हसरंगा, हेझलवुड आणि अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली.