SRH vs GT : उम्रान मलिकची तुफान स्पीड, गुजरातच्या फलंदाजांना केलं हैराण, सोशल मीडियावर मीम्स झाले व्हायरल
हैदराबादने गुजरात टायटन्सला 162 धावांत रोखलं असून आता विजयासाठी त्यांना 163 धावा करायच्या आहेत.
IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील आजचा 21 वा सामना गुजरात आणि हैदराबाद यांच्यात पार पडत असून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करत गुजरातला 162 धावांत रोखलं आहे. यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली पण हार्दिकच्या अर्धशतकामुळे गुजरातचा डाव सावरला. दरम्यान यावेळी उम्रान मलिक या युवा वेगवान गोलंदाजाने पुन्हा एकदा त्याच्या वेगवान गोलंदाजीचं दर्शन घडवलं
मागील आय़पीएलमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू फेकणाऱ्या उम्रानला त्याच्या स्पीडमुळेच हैदराबादने रिटेन केलं होतं. त्यानंतर यंदाही तो 140 हून अधिक स्पीडचे चेंडू फेकत आहे. आजही त्याने दमदार चेंडू फेकले एक विकेट देखील घेतली. त्याने मॅथ्यू वेडला पायचीत केलं. त्याच्या या दमदार गोलंदाजीनंतर अनेक मीम्स आणि पोस्ट शेअर केले जात आहेत. त्यावर एक नजर फिरवूया...
गुजरातची फलंदाजी
आजच्या सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकत हैदराबदाने गोलंदाजी निवडली. त्यानुसार वेगवान गोलंदाजांनी एकमागोमाग एक विकेट्स देखील घेण्यास सुरुवात केली. गुजरातचे गडी एकामागोमाग एक बाद होत असताना एका बाजूला कर्णधार हार्दिकने लढा कायम ठेवला. त्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावा ठोकल्या. काही काळासाठी अभिनव मनोहर (35) याची त्याला साथ देखील मिळाली. ज्यामुळे 20 षटकात 7 गडी गमावात गुजरातने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर मार्को आणि उम्रान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर गुजरातचा एक गडी धावचीत झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Watch Video: राहुल त्रिपाठीनं एका हातानं पकडला शुभमन गिलचा अफलातून झेल, पाहून प्रेक्षकही झाले हैराण
- IPL 2022 : राजस्थानचा हल्लाबोल! गुणतालिकेत अव्वल, पर्पल-ऑरेंज् कॅपवरही कब्जा
- KKR vs DC Top 10 Key Points : दिल्लीचा कोलकात्यावर 44 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha