IPL च्या 15 वर्षाच्या इतिहासात मुंबईबरोबर पहिल्यांदाच असे झाले
Mumbai Indians IPL history : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघाने विजायने शेवट केला.
![IPL च्या 15 वर्षाच्या इतिहासात मुंबईबरोबर पहिल्यांदाच असे झाले This is the first time Mumbai Indians finishing last in the points table in IPL history IPL च्या 15 वर्षाच्या इतिहासात मुंबईबरोबर पहिल्यांदाच असे झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/22/e16adfdcdaff3b70adeaf55ccab230f1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Indians IPL history : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघाने विजायने शेवट केला. पण यंदाच्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईला दहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आठ गुणांसह मुंबई गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या पंधरा वर्षाच्या इतिहासात मुंबईवर अशी वेळ पहिल्यंदाच आली आहे. याआधी मुंबईचा संघ कधीही दहाव्या क्रमांकावर नव्हता.. पण यंदा सर्वात खऱाब कामगिरी झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईन आयपीएलमध्ये सर्वात चांगली आणि सर्वात खराब कामगिरी केली आहे.
पहल्यांदाच दहाव्या क्रमांकावर -
आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात मुंबईचा संघ पहिल्यांदाच गुणतालिकेच्या तळाशी राहिली आहे. आयपीएलमधील मुंबईची आतापर्यंतची ही सर्वात लाजिरवाणी कामगिरी होय. रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईला यंदा दहाव्या क्रमांकावर राहावे लागलेय. 2013, 2015, 2017, 2019, 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलवर नाव कोरलेय.
This is the first time Mumbai Indians finishing last in the points table in IPL history.
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2022
सलग दुसऱ्या वर्षी प्लेऑफमधून बाहेर -
लागपोठ दुसऱ्या वर्षी मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आलेले नाही. गतवर्षी आणि यंदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलेय. तसेच एका हंगामात दहा सामन्यात पराभव स्विकारण्याची मुंबई पहिलीच वेळ आहे.
चेन्नईचीही खराब अवस्था -
मुंबईनंतर आयपीएलचे सर्वाधिक चषक चेन्नईकडे आहेत. पण यंदा चेन्नईची अवस्था मुंबईपेक्षा वेगळी नाही. चेन्नईलाही यंदा दहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झालेय. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा :
मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफचं गणित ठरलं, आरसीबी टॉप 4 मध्ये, पाहा वेळापत्रक
IPL 2022 : मुंबईचा दिल्लीला दे धक्का, निर्णायक सामन्यात दिल्लीचा पाच विकेटने पराभव
मुंबईचा विजय होताच विराट कोहलीनं केले ट्वीट, आरसीबीच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन
रोहित शर्माची IPLमधील सर्वात खराब कामगिरी यंदा, अर्धशतकही झळकावता आले नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)