IPL मध्ये सर्वात महागडा स्पेल कुणाचा? प्रत्येक संघाकडून कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक धावा खर्च केल्या
IPL Bowling Stats : मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. अर्शदीपने 3.5 षटकात 17.20 च्या इकॉनमीने 66 धावा खर्च केल्या.
IPL Bowling Stats : मुंबईच्या गोलंदाजांनी पंजाबच्या अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. अर्शदीपने 3.5 षटकात 17.20 च्या इकॉनमीने 66 धावा खर्च केल्या. अर्शदीपचा आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल होता. यंदाच्या हंगामातील दुसरी आणि आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात महागडा स्पेल ठरलाय. आयपीएलच्या इतिहासात हैदराबादकडून खेळताना बासिल थम्पी याने सर्वात जास्त धावा खर्च केल्या. थम्पी याने चार षटकात ७० धावा खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकाला यश दयाल याचा क्रमांक लागतो. यश दयाल याने कोलकात्याविरोधात चार षटकात ६९ धावा खर्च केल्या. कोलकात्याच्या रिंकू सिंह याने यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार लगावले होते.
यश दयाल याने आयपीएलच्या इतिहासात दुसरा महागडा स्पेल फेकल. हैदराबादचा बासिल थम्पी पिहल्या क्रमांकावर आहे. थम्पीने ७० धावा दिल्या होत्या. अर्शदीप तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. अर्शदीपने चार षटकात ६६ धावा खर्च केल्या. पंजाबकडून खेळणाऱ्या मजीबचा नकोसा विक्रम अर्शदीप याने मोडला. मुजीब याने पंजाबकडून खेळताना ६६ धावा दिल्या होत्या.
आयपीएलमधील प्रत्येक संघाकडून कुणी कुणी सर्वात महागडा स्पेल टाकला -
बासिल थम्पी (सनरायजर्स हैदराबाद)- 70 धावा.
यश दयाल (गुजरात टाइटंस)- 69 धावा.
मुजीब उर रहमान/ अर्शदीप सिंह (पंजाब किंग्स)- 66 धावा.
जोश हेजलवुड (आरसीबी)- 64 धावा.
लुंगी एंगिडी (चेन्नई सुपर किंग्स)- 62 धावा.
अंकित राजपूत (राजस्थान रॉयल्स)- 60 धावा.
रेयान मैक्लारेन (कोलकाता नाइट रायडर्स)- 60 धावा.
आवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)- 60 धावा.
लासिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स)- 58 धावा.
अर्शदीपची धुलाई -
मोहालीच्या मैदानावर अर्शदीप याने महागडी गोलंदाजी केली. मुंबईच्या गोलंदाजांनी अर्शदीप याच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अर्शधीप याने जवळपास १८ च्या सरासरीने प्रति षटक धावा खर्च केल्या. अर्शदीपने ३.५ षटकात तब्बल ६६ धावा दिल्या. पंजाबकडून हा सर्वात महागडा स्पेल ठरला. अर्शदीप याने आतापर्यंतची सर्वात निराशाजनक कामगिरी केली.
पर्पल कॅपसाठी भारतीय गोलंदाजामध्ये चढाओढ -