(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT Vs SRH: Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबादचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांची Playing XI
GT Vs SRH: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुजरात आणि हैदराबाद संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आज सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
Sunrisers Hyderabad have elected to bat against Gujarat Titans in Match 12 of #TATAIPL 2024.
Follow the match ▶️ https://t.co/hdUWPFsHP8 #GTvSRH | @gujarat_titans | @SunRisers pic.twitter.com/biGZbav8h0
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात गुजरात आणि हैदराबाद संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. हैदराबादने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातचा संघ घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. त्याचा फायदा गुजरातला मिळू शकतो.
शुभमन गिलचा अहमदाबादमध्ये आतापर्यंत चांगला रेकॉर्ड आहे. गुजरातने या मोसमात आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. तर सनरायझर्स हैदराबादनेही आतापर्यंत दोन सामने खेळले असून यामध्ये एक विजय मिळवला आहे.
गुजरात टायटन्सची Playing XI:
रिद्धिमान साहा (W), शुभमन गिल (C), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे.
Gujarat Titans (Playing XI): Wriddhiman Saha(w), Shubman Gill(c), Azmatullah Omarzai, David Miller, Vijay Shankar, Rahul Tewatia, Rashid Khan, Umesh Yadav, Noor Ahmad, Mohit Sharma, Darshan Nalkande
सनरायझर्स हैदराबादची Playing XI:
मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
Sunrisers Hyderabad (Playing XI): Mayank Agarwal, Travis Head, Abhishek Sharma, Aiden Markram, Heinrich Klaasen(w), Abdul Samad, Shahbaz Ahmed, Pat Cummins(c), Bhuvneshwar Kumar, Mayank Markande, Jaydev Unadkat
गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ:
रिद्धिमान साहा (w), शुभमन गिल (c), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुदर्शन, शरथ बीआर, अभिनव मनोहर, नूर अहमद, मानव सुथार, केन विल्यमसन, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, मॅथ्यू वेड
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:
ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, वानिंदू हसरंगा, अनमोलप्रीत सिंग, सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग