(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH vs MI: पांड्याच्या नेतृत्वात मुंबईच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, IPL च्या इतिहासातील सर्वोच्च धावांची नोंद
SRH vs MI: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादच्या मैदानावर एसआरएचच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली,
SRH vs MI: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादच्या मैदानावर एसआरएचच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली, ज्याचा कधीही कुणीही विचार केला नसेल. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोइत्जे या सर्वांचा समाचार घेतला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हैदराबादने निर्धारित 20 षटकांमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात 277 धावांचा पाऊस पाडला. आयपीएलमध्ये याआधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आरसीबीच्या नावावर होता. आरसीबीने पुण्याविरोधात 2013 मध्ये 213 धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम आज मोडीत निघाला आहे.
हैदराबादविरोधात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हैदराबादच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत हार्दिक पांड्याचा निर्णय चुकीचा असल्याचं दाखवून दिले. ट्रेविस हेड याने सुरुवातीला वादळी फलंदाजी केली. त्याने 18 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. हेड याने 24 चेंडूमध्ये 62 धावांचा पाऊस पाडला. हेडचं टेन्शन संपते ना संपते तोच अभिषेक शर्माने चार्ज हातात घेतला. अभिषेक शर्माने फक्त 16 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. अभिषेक शर्माने 23 चेंडूमध्ये 63 धावा चोपल्या. हे कमी होतं की काय म्हणून हेरनरिक क्लासेन यानेही मुंबईच्या गोलंदाजांचा चोप दिला. क्लासेन याने 34 चेंडूमध्ये 80 धावांचा पाऊस पाडला. हैदराबादने मुंबईविरोधात आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या कुणी किती ?
277 धावा - हैदराबाद -आयपीएल 2024 - मुंबईविरोधात
263 - आरसीबी -- आयपीएल 2013 - पुणे वॉरियर्सविरोधात
257 - लखनौ सुपर जायंट्स - आयपीएल 2023 - पंजाब किंग्सस
248 - आरसीबी - आयपीएल 2016 - गुजरात लायन्स
246 - चेन्नई - आयपीएल 210 - राजस्थान रायल्स
𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝘆 𝗯𝗿𝗶𝗹𝗹𝗶𝗮𝗻𝘁!
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
An all time IPL record now belongs to the @SunRisers 🧡
Scocrecard ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/eRQIYsLP5n
मुंबई इंडियन्सविरोधात आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 235 इतकी होती. 2015 मध्ये आरसीबीने मुंबईविरोधात वानखेडेवर एक बाद 235 धावांचा पाऊस पाडला होता. गुजरातने 2023 मध्ये 3 बाद 233 धावा केल्या होत्या. 2019 मध्ये कोलकात्याने मुंबईविरोधात ईडन गार्डन मैदानावर 2 बाद 232 धावा केल्या होत्या. आता हैदराबादने 3 बाद 277 धावांचा पाऊस पाडत सर्वांना मागे टाकलेय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला ट्रोल केले जात आहे. चाहत्यांचा राग अनावर गेला आहे.