एक्स्प्लोर

पहिला सामना जिंकला पण गुजरातला मोठा धक्का, विल्यमसन आयपीएलमधून आऊट

IPL 2023 : गुजरात संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला

Kane Williamson ruled out of IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण पहिल्याच सामन्यात गुजरातला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी केन विल्यमसन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर गेलाय. चेन्नईविरोधातील सामन्यात फिल्डिंग करताना विल्यमसनच्या पायाला दुखापत झाली होती. दोन खेळाडूंनी विल्यमसनला मैदानाबाहेर नेले होते. विल्यमसनच्या पायाचे एक्स रे आणि स्कॅन करण्यात आले, त्यानंतर तो काही दिवस क्रिकेट खेळू शकत नसल्याचे समोर आले आहे. विल्यमसन आयपीएलमधून बाहेर गेलाय. 

ऋतुराज गायकवाड याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता.  फिल्डिंग करताना 13 व्या षटकात जोशुआ लिटिलच्या चेंडूवर विल्यमसनला दुखापत झाली. जोशुआच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड याने मोठा फटका मारला, त्याचवेळी सीमारेषावर असलेल्या विल्यमसन याने झेल घेण्याचा प्रयत्न केला.   विल्यमसन जवळपास तीन सेकंद हवेत झेपावत चेंडू आतामध्ये टाकला. पण जमीनीवर पडताना त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असून विल्यमसनला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे विल्यमसन आयपीएलमधून बाहेर पडलाय. 

विल्यमसनच्या जागी कोण? 

विल्यमसनच्या जागी गुजरात संघ ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टिव्ह स्मिथ याला संधी देऊ शकतो. उर्वरित आयपीएलमध्ये स्मिथ गुजरात संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता काही प्रसारमाध्यमांनी वर्तवली आहे. सध्या स्मिथ समालोचक म्हणून काम पाहात आहे. पण विल्यमसनला दुखापत झाल्यानंतर स्मिथसोबत गुजरात करार करु शकतो, असा अंदाज वर्तवलाय. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात स्मिथवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. स्मिथची बेस प्राईज दोन कोटी रुपये इतकी होती. स्मिथला खरेदी कऱण्यासाठी एकही संघ समोर आला नव्हता. आता विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यानंतर गुजरात स्मिथसोबत करार करु शकतो. 

आयपीएलचा स्मिथकडे तगडा अनुभव -

ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. आतापर्यंत स्मिथने 103 सामने खेळले आहेत. 93 डावात फलंदाजी करताना स्मिथने 34 च्या सरासरीने 2485 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही स्मिथकडे मोठा अनुभव आहे. स्मिथने आतापर्यंत 96 कसोटी, 142 वनडे आणि 63 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत 8792, वनडेत 4939 आणि टी 20 मध्ये 1008 धावा आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
काव्या मारनच्या लग्नाची तारीख ठरली? बॉलिवूड स्टारसोबत संसार थाटणार असल्याच्या चर्चा, रजनीकांत यांच्यासोबत खास कनेक्शन...
Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ
Rishabh Pant and Kuldeep Yadav Trade IPL 2027: IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; कोट्यवधी रुपयांचा करार, पंतला 12 कोटींचे नुकसान
IPL 2027 पूर्वी सर्वात मोठा 'ट्रेड': ऋषभ आणि कुलदीप यांनी संघ बदलले; पंतला 12 कोटींचे नुकसान
Rishabh Pant: रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? रिपोर्टमध्ये नवा दावा
रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं की LSG नं काढून घेतलं, नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget