पॅट कमिन्सपुढे गब्बरचं आव्हान, पंजाब अन् हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11
IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएलच्या मैदानात आज (9 एप्रिल 2024) सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे
IPL 2024 PBKS vs SRH : आयपीएलच्या मैदानात आज (9 एप्रिल 2024) सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. पॅट कमिन्स आणि शिखर धवन यांच्यातील सामना कोण जिंकणार ? याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. मुल्लांपुर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.
पॅट कमिन्स आणि शिखर धवन यांच्या संघाला आपल्या तिसऱ्या विजयाची प्रतिक्षा असेल. दोन्ही संघाला प्रत्येकी चार सामन्यात दोन दोन विजय मिळाले आहेत. पण सरस नेटरनरेटच्या जोरावर हैदराबादने गुणतालिकेत पंजाबपेक्षा वरचं स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल? दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग 11 पाहूयात..
पिच रिपोर्ट
मुल्लांपुरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजांना सपोर्ट करणारी संतुलित आहे. पण या मैदानावर जास्त फलंदाजांना मदत मिळू शकते. फिरकी गोलंदाजापेक्षा वेगवान गोलंदाजांना जास्त विकेट मिळण्याची शक्यता आहे.
या मैदानावर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 174 धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना पंजाबने सनसनाटी विजय मिळवला.
मॅच प्रिडिक्शन
आयपीएलच्या 17 व्या हंगामात पंजाब आणि हैदराबाद संघाने शानदार सुरुवात केली आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत दोन दोन विजयाची नोंद केली आहे. पंजाब आणि हैदराबाद संघाने आपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल, आशा स्थितीमध्ये आज कोण जिंकेल? हे सांगणं थोडं कठीणच आहे. पण हैदराबादची धाकड फलंदाजी पंजाबवर वरचढ ठरु शकते. पण पंजाबला घरच्या मैदानावर चाहत्यांचा सपोर्ट मिळेल, त्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Our love ➡️ Jitesh! ❤️
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 9, 2024
Jitesh's love ➡️ Pull shots! 🫶🏻#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #PBKSvSRH pic.twitter.com/MpMli3AJJM
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग 11
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंह, सॅम कर्रन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, सिकंदर रजा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह.
इम्पॅक्ट प्लेयर- आशुतोष शर्मा.
सनराजर्स हैदराबादचे संभाव्य 11 शिलेदार
अभिषेक शर्मा, ट्रॅविस हेड, एडन मार्कराम, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी/वाशिंगटन सुंदर, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, जयदेव उनादकट
इम्पॅक्ट प्लेयर- उमरान मलिक.