जेसन रॉय परतला, हैदराबाद संघातही बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
SRH vs KKR, IPL 2023 : कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
SRH vs KKR, IPL 2023 : कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्करमच्या नेतृत्वातील हैदराबाद संघ राजीव गांधी स्टेडियमवर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नीतीश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याशिवाय कोलकात्याच्या संघात दोन बदल करण्यात आले आहे. कोलकात्याने एन जगदीशन आणि डेविड विज यांना संघाबाहेर बसवलेय. हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. कार्तिक त्यागीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेय.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग ११ -
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबादचे ११ शिलेदार कोणते ?
मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को यानसेन, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.
हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज सामना होत आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे. ज्या संघाचा पराभव होईल, त्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
हेड टू हेड –
सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. दोन्ही संघातील आकडेवारीवरुन कोलकाता संघाचे पारडे जड दिसत आहे. कोलकाताने आतापर्यंत 24 पैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादला फक्त एका सामन्यात बाजी मारता आली आहे. दोन्ही संघातील अखेरच्या पाच सामन्याचा विचार केला तर हैदराबाद संघ वरचढ असल्याचे दिसतेय. मागील पाच सामन्यात हैदराबादने तीन सामने जिंकले आहेत. त्याशिवाय यंदाच्या हंगामातील पहिला सामनाही हैदराबादने जिंकला आहे.
राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी सपाट आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. या मैदानावर फलंदाज सहज धावा काढू शकतात. चेंडू बॅटवर सहज येतो. त्यातच मैदान छोटे आहे, त्यामुळे येथे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. आतापर्यंत या मैदानावर 68 आयपीएलचे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संगाने 30 वेळा बाजी मारली आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 38 वेळा बाजी मारली. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 177 इतकी आहे. येथील सर्वोच्च धावसंख्या 231 इतकी आहे तर निच्चांकी धावसंक्या 80 आहे.