SRH vs GT IPL 2025 : खुलता कळी खुलेना! काव्या मारनच्या हैदराबादचा पराभवाचा चौकार, आता गुजरातनेही घरात घुसून लोळवले
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा विजयी रथ धावत आहे.

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans IPL 2025 : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा विजयी रथ धावत आहे. आयपीएल 2025 मधील त्यांच्या चौथ्या सामन्यात गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. काव्या मारनच्या हैदराबादचा या हंगामातील चौथा पराभव पत्करावा लागला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला सलग चौथ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. सलग तिसरा सामना जिंकल्यानंतर गुजरातने पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थानही मिळवले आहे. या विजयाचा स्टार मोहम्मद सिराज होता. त्याच वेळी, कर्णधार शुभमन गिलनेही कठीण परिस्थितीत शानदार खेळी खेळली.
3️⃣ wins on the trot 💙
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
A commanding 7️⃣-wicket win over #SRH takes #GT to the second spot in the #TATAIPL 2025 points table 🆙
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#SRHvGT | @gujarat_titans pic.twitter.com/tYB1Dt5mdd
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची रणनीती चांगली ठरली, कारण ट्रॅव्हिस हेड फक्त 8 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा 18 धावा आणि इशान किशन 17 धावा काढून बाद झाला. एसआरएचचे तिन्ही टॉप ऑर्डर फलंदाज 50 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले.
नितीश रेड्डी-हेनरिक क्लासेन यांची 50 धावांची भागीदारी
सनरायझर्स हैदराबाद अडचणीत होती, दरम्यान नितीश कुमार रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी 50 धावांची अत्यंत भागीदारी केली. नितीशने 31 धावा आणि क्लासेनने 27 धावा केल्या. एकेकाळी हैदराबादने 15 षटकांत 105 धावा केल्या होत्या आणि संघाच्या 6 विकेट हातात होत्या. पण शेवटच्या 5 षटकांत हैदराबाद संघाने 4 विकेट गमावल्या आणि 47 धावा जोडल्या. शेवटच्या षटकांमध्ये, कर्णधार पॅट कमिन्सने 9 चेंडूत 22 धावांची छोटी खेळी खेळली, ज्यामुळे एसआरएचचा धावसंख्या 150 च्या पुढे गेली.
मोहम्मद सिराजची दमदार गोलंदाजी
मोहम्मद सिराजने आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात 54 धावा दिल्या होत्या, परंतु पुढील 3 सामन्यांमध्ये सिराजने 9 विकेट घेतल्या आहेत. आता सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंग यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
𝐓𝐡𝐞 𝐒𝐈𝐔𝐔𝐔-𝐑𝐀𝐉 𝐬𝐡𝐨𝐰 𝐢𝐧 𝐇𝐲𝐝𝐞𝐫𝐚𝐛𝐚𝐝 🫡
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
🔽 Click below to relive Mohd. Siraj's sensational spell 🔥https://t.co/rRa2liYk3M #TATAIPL | #SRHvGT | @mdsirajofficial pic.twitter.com/TCuQ2aJJS2
गुजरात टायटन्सला 153 धावांचे लक्ष्य मिळाले. संथ खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे सोपे नव्हते. हैदराबादने गोलंदाजीतही चांगली सुरुवात केली कारण फॉर्ममध्ये असलेला फलंदाज साईला 5 धावांवर आऊट केले आणि जोस बटलर कोणतीही धाव न काढता बाद झाला. यामुळे गुजरातने फक्त 16 धावांत 2 विकेट गमावल्या.
Glorious shots on display 🫡
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
Captain Shubman Gill led from the top and remained unbeaten with a well constructed innings of 61(43) 👏
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr7tkC#TATAIPL | #SRHvGT | @ShubmanGill pic.twitter.com/1CWQU5gd82
शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरचा धमाका
गुजरातने 16 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. येथून शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संपूर्ण सामनाच फिरवला. दोघांमध्ये 90 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरात विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. 49 धावांवर मोहम्मद शमीने सुंदरला आऊट केले. त्याचा झेल अनिकेत वर्माने घेतला. कर्णधार शुभमन गिल सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि नाबाद 61 धावा करत शानदार सामना जिंकून देणारा डाव खेळला. सुंदर बाद झाल्यानंतर शेरफान रदरफोर्डने कर्णधार गिलला पाठिंबा दिला. रुदरफोर्डने 16 चेंडूत 35 धावांची जलद खेळी केली आणि गुजरातचा विजय निश्चित केला.





















