Shreyas Iyer : फक्त चार तास झोपलो आणि..., पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर आयपीएल फायनलपूर्वी काय म्हणाला?
IPL 2025 : आयपीएल फायनल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. 18 व्या हंगामात आयपीएलला नवा विजेता मिळेल.

नवी दिल्ली : पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आयपीएल फायनल होणार आहे. 3 जूनला ही फायनल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यर यानं उद्याच्या फायनलपूर्वी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी श्रेयस अय्यर म्हणाला की मी झोपलेलो नाही, कसबसं चार तास झोप मिळाली आणि इथं आलो. मी माझ्या रुममध्ये गेलो, सकाळी मला समजलं की इथं पत्रकार परिषद घ्यायची आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या क्वालिफायर 2 च्या लढतीत श्रेयस अय्यरनं 41 बॉलमध्ये 87 धावा केल्या. श्रेयस अय्यरनं पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. आता 18 व्या आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. पंजाब किंग्ज आयपीएलच्या फायनलमध्ये 2014 मध्ये पोहोचलं होतं. त्यावेळी त्यांना केकेआरनं पराभूत केलं होतं. आरसीबीनं पंजाब किंग्जला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत केलं होतं. पंजाब किंग्ज त्याचा बदला घेणार का हे पाहावं लागेल.
पंजाब किंग्जनं मुंबईनं दिलेलं 204 धावांचं आव्हान पार करत अंतिम फेरीत प्रवेश केला. जोश इंग्लिसनं 21 बॉलमध्ये 38 धावा करत चांगली सुरुवात करुन दिली. जोस इंग्लिसनं जसप्रीत बुमराहला एका ओव्हरमध्ये 20 धावा काढल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांनी दमदार भागीदारी केली. नेहाल वढेरानं 29 बॉलमध्ये 48 धावा केल्या. दोघांनी 84 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
श्रेयस अय्यरनं नाबाद 87 धावांची खेळी करत पंजाबला फायलनमध्ये पोहोचवलं. श्रेयस अय्यरनं या डावात 8 षटकार मारले. या कामगिरीसंदर्भात श्रेयस अय्यर म्हणाला की आयपीएलमधील मधील ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
श्रेयस अय्यरनं गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करत त्यांना विजेतेपद मिळवून दिलं होतं. याशिवाय त्यानं दिल्लीला एकदा प्लेऑफमध्ये तर एकदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलं होतं. आता श्रेयस अय्यर पंजाब किंग्जला फायनलमध्ये घेऊन आला आहे. पंजाब किंग्जच्या संघानं मुंबई इंडियन्सला क्वालिफायरमध्ये 2 मध्ये पाच विकेटनं पराभूत केलं.
आरसीबीचा बदला घेणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जला 8 विकेटनं पराभूत केलं होतं. आरसीबीनं प्लेऑफ 1 पूर्ण वर्चस्व ठेवलं होतं. पंजाब त्या मॅचचा बदला घेतं का ते पाहावं लागले. आता आरसीबी आणि पंजाब किंग्ज पुन्हा एकदा फायनलच्या निमित्तानं आमने सामने येतील. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे आयपीएलच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पंजाब किंवा बंगळुरु यांच्यात कोणीही जिंकलं तरी यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणारआहे.




















