Sarfaraz Khan Ind vs Eng : विराट कोहलीची जागा घेणार 'हा' मुंबईचा पठ्ठ्या; इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार तयारी, 10 किलो वजन केले कमी
Sarfaraz Khan loses 10 KG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पूर्णपणे वेगळा दिसणार आहे.

India Squad England Tour 2025 : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. टीम इंडिया इंग्लंडच्या भूमीवर नवीन कसोटी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल. पण कोहली आणि रोहितच्या जागी निवड समिती कोणाची निवड करते हे पाहणे देखील मनोरंजक असेल.
इंग्लंडला जाण्यासाठी निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी एक फलंदाज कठोर परिश्रम करत आहे. त्याने त्याचे वजन जवळपास 10 किलो कमी केले आहे. यासोबतच तो दिवसातून दोनदा सराव करत आहे. इंग्लंडमध्ये ऑफ-स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूंना तोंड देण्यासाठी मुंबईच्या 27 वर्षीय गोलंदाज चांगली तयारी करत आहे.
विराट कोहलीची जागी घेणार 'हा' मुंबईचा पठ्ठ्या!
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेईल हा आजकालचा सर्वात मोठा प्रश्न आहे. चौथ्या क्रमांकावर कोहलीची जागा घेण्यासाठी केएल राहुल आणि शुभमन गिलची नावे आघाडीवर असली तरी, एक फलंदाज विराटची जागा घेण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. नाव आहे सरफराज खान.
SARFARAZ KHAN - THE VERSION - Worked hard on his fitness & Diet. [Gaurav Gupta from TOI] pic.twitter.com/ErFHxg7aP4
— Johns. (@CricCrazyJohns) May 18, 2025
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सरफराज खानने 10 किलो वजन कमी केले (Sarfaraz Khan loses 10 KG) आणि तो सध्या त्याच्या आहाराची खूप काळजी घेत आहे. एवढेच नाही तर सराव सत्रांमध्ये सरफराज खूप घाम गाळत आहे. इंग्लंडच्या परिस्थितीत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना तोंड देण्यासाठी सरफराज चांगली तयारी करत आहे. सरफराज देखील स्विंगवर तोडगा काढण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे.
🚨 SARFARAZ KHAN WORKING HARD FOR ENGLAND TOUR 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) May 18, 2025
- Sarfaraz loses 10 kg through strict diet, practicing twice a day, working on the outside off-stump discipline, which is key to success in the swinging conditions of England. [India Today] pic.twitter.com/Wue7V2Fdji
सरफराज खानची इंडिया-अ साठी झाली निवड...
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारत-अ संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आला आहे. आता त्याला मुख्य संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा भाग सरफराज होता, पण त्याला प्लेइंग -11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत सरफराजने शानदार शतक झळकावले होते.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच अ संघ
अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, ईशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, तनुष कोटीयन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुबमन गिल आणि साई सुदर्शन.





















