एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

IPL: संजीव गोयंकांनी MS धोनीला हटवून स्मिथला केले होते कर्णधार; पराभव होताच साक्षी म्हणाली 'कर्माची फळं'!

IPL MS Dhoni: लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता.

IPL MS Dhoni: लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत. लखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. 

हैदराबादविरुद्धचा लाजिरवाणा पराभव आणि संजीव गोएंका वादानंतर केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संजीव गोयंका यांनी संघाच्या कर्णधारावर राग काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे 2016 आणि 2017 च्या काळातील आहे जेव्हा मॅच फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएलमधून निलंबित करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांची जागा रायझिंग पुणे सुपर जायंट्स (आरपीएस) आणि गुजरात लायन्स (जीएल) फ्रँचायझींनी घेतली होती.

धोनीलाही कर्णधारपदावरून हटवले होते-

आयपीएल 2016 पूर्वी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सला दोनदा चॅम्पियन बनवले होते. पण 2016 चा हंगाम रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खूपच खराब होता. साखळी टप्प्यात खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी केवळ 5 वेळा आरपीएसने विजय मिळवला. गुणतालिकेत संघ सातव्या स्थानावर आहे. मोसमातील खराब कामगिरीमुळे संजीव गोयंका आणि व्यवस्थापनातील इतर सदस्यांनी मिळून धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते.

आम्ही स्टीव्ह स्मिथला पुढील हंगामासाठी...

गोयंका यांनी त्यावेळी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, "एमएस धोनीने कर्णधारपद सोडले नाही, परंतु आम्ही स्टीव्ह स्मिथला पुढील हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे. खरे सांगायचे तर, मागील हंगाम आमच्यासाठी चांगला नव्हता आणि त्यामुळे आम्हाला बदल करावा लागला. 

संजीव गोएंका यांच्या भावाने वाढवला-

एमएस धोनीला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते अजिबात खूश नव्हते. संजीव गोएंका यांचा भाऊ हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक वादग्रस्त पोस्ट केल्याने या प्रकरणाला वेग आला. 2017 च्या हंगामात पुणे आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान हर्ष गोयंका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, जंगलाचा खरा राजा कोण आहे हे स्मिथने सिद्ध केले आहे. स्मिथ आता धोनीपेक्षा चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध होत आहे. स्मिथला कर्णधार बनवून आपण चांगला निर्णय घेतल्याचेही हर्ष म्हणाले होते.

धोनीची पत्नी साक्षीच्या पोस्टचीही चर्चा-

आम्ही तुम्हाला सांगतो की हर्ष गोयंका ज्या कमी धावसंख्येच्या सामन्याचा उल्लेख करत होते, त्या सामन्यात स्मिथने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले होते. पण त्या सामन्यात मुंबईने रोमहर्षक पद्धतीने 1 गडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यानंतर काही दिवसांनी, एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर चेन्नई संघाची जर्सी घातलेला एक फोटो शेअर केला आणि  हे कर्माचे फळ आहे, असं लिहिले होते. 

संबंधित बातम्या:

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?

Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget