ऋतुराज गायकवाडनं इतिहास रचला, CSK च्या इतिहासात पहिल्यांदाच केला असा पराक्रम
Ruturaj Gaikwad Creates History : चेन्नई संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्णधाराने इतिहास रचला आहे. ऋतुराज गायकवाडनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
CSK Captain Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासात पहिल्यांदाच भीम पराक्रम केला आहे. पहिल्यांदाच चेन्नईच्या कर्णधार (CSK Captain) पदाची जबाबदारी घेतलेल्या ऋतुराज गायकवाडने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराने (CSK Skipper) अशी कामगिरी केली आहे. यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नावे आणखी एक रेकार्ड नोंदवला गेला आहे.
ऋतुराज गायकवाडनं इतिहास रचला
ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2024 मध्ये 500 धावांचा आकडा पूर्ण करत मोठी कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका आयपीएल हंगामात 500 धावा करण्याचा विक्रम रचला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या इतिहासात कर्णधाराने 500 धावा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराजने 500 धावांचा टप्पा पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे.
धोनीचा विक्रम मोडीत रचला नवीन विक्रम
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघासाठी या हंगामात ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) सीझनमध्ये चेन्नईचा (CSK) कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा कामगिरीत ऋतुराजने महेंद्र सिंह धोनीला मागे टाकलं आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने कर्णधार म्हणून 500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ऋतुराजने पंधराव्या सामन्यात 462 धावसंख्या केली. यामुळे त्याने 2013 हंगामात धोनीने कर्णधार म्हणून केलेल्या 461 धावांचा विक्रम मोडीत काढला. आता त्याने सीएसकेचा कर्णधार म्हणून 500 धावा करण्याचा नवा विक्रम रचला आहे.
RUTURAJ GAIKWAD BECOMES THE FIRST CSK CAPTAIN IN HISTORY TO SCORE 500 RUNS IN AN IPL SEASON. 💥 pic.twitter.com/K60aweFiH1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2024
CSK च्या इतिहासात पहिल्यांदाच केला असा पराक्रम
याआधीही ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार (CSK Captain) म्हणून आणखी एक व्रिकम आपल्या नावे केला होता. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून शतक ठोकण्याचा विक्रमही ऋतुराज गयकवाडच्या नावावर आहे. सीएसकेचा कर्णधार बनून शतकी खेळी करणार ऋतुराज गायकवाड हा एकमेव कॅप्टन आहे. सीएसकेच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा इतिहास रचला गेला आहे.
ऋतुराज गायकवाडने यंदाच्या मोसमात आयपीएल 2024 मध्ये 509 धावा केल्या आहेत. यामुळे आयपीएलमध्ये एका मोसमात 500 धावा करणारा तो चेन्नई सुपर किंग्जचा पहिला कर्णधार बनला आहे. ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2013 मधील एमएस धोनीच्या 461 धावसंख्येला मागे टाकले आणि सीएसकेचा कर्णधार म्हणून आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.