एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आरसीबीचं हैदराबादसमोर 207 धावांचं आव्हान, पाटीदारचं वादळी अर्धशतक

SRH vs RCB, IPL 2024 : रजत पाटीदारचं आक्रमक अर्धशतक आणि विराट कोहलीचं संयमी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली.

SRH vs RCB, IPL 2024 : रजत पाटीदारचं आक्रमक अर्धशतक आणि विराट कोहलीचं संयमी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. पाटीदारनं 50 आणि विराट कोहलीनं 51 धावांची खेळी केली. अखेरीस कॅमरुन ग्रीन यानं 37 धावा जोडल्या. हैदराबादकडून जयदेव उनादकट यानं तीन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 207 धावांचं आव्हान आहे.

आरसीबीची आक्रमक सुरुवात - 

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसनं नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीला वेगवान सुरुवात दिली. दोघांनी 23 चेंडूमध्ये 48 धावांची भागिदारी केली. कर्णधार फाफ डु प्लेसिस यानं 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये फाफने एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. फाफ बाद झाल्यानंतर आरसीबाला ठरावीक अंतरानं दुसरा झटका बसला. विल जॅक्स नऊ चेंडूवर सहा धावा काढून बाद झाला. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहलीनं संथ फलंदाजी केली. पण दुसऱ्या बाजूला रजत पाटीदार यानं शानदार फलंदाजी केली. 

रजत पाटीदारचं वादळी अर्धशतक - 

लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर रजत पाटीदार यानं कोणताही दबाव न घेता फलंदाजी केली. रजत पाटीदारने आरसीबीसाठी वेगानं धावा जमवल्या. रजत पाटीदार यानं 20 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. रजत पाटीदार शानदार फटकेबाजी करत असताना विराट कोहली दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी करत होता. रजत पाटीदार यानं आपल्या खेळीमध्ये पाच षटकार आणि दोन चौकार ठोकले. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतकी भागिदारी करत आरसीबीचा डाव सावरला. 

विराट कोहलीचं अर्धशतक -

विराट कोहली यानं संयमी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. विराट कोहलीनं आक्रमक सुरुवात केली, पण विकेट पडल्यानंतर बॅट शांत झाली.  विराट कोहलीने 43 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. विराट कोहलीने आपल्या संयमी खेळीमध्ये चार चौकार आणि एक षटकार ठोकले. 

कॅमरुन ग्रीनचा फिनिशिंग टच - 

विराट कोहली बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोरही लगेच तंबूत परतला. लागोपाठ विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला कॅमरुन ग्रीन आक्रमक फलंदाजी करत होता. महिपाल लोमरोर यानं चार चेंडूमध्ये सात धावांची खेळी केली. दिनेश कार्तिक यानं सहा चेंडूमध्ये 11 धावांची खेळी केली. स्वपिन्ल सिंह यानं अखेरच्या षटकात इम्पॅक्ट खेळी केली. स्वप्निलनं सहा चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन यानं आरसीबीला फिनिशिंग टच दिला. कॅमरुन ग्रीन यानं 20 चेंडूमध्ये 37 धावांची केळी केली. यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. 

जयदेव अनादकटचा भेदक मारा - 

हैदराबादकडून जयदेव उनादकट यानं शानदार गोलंदाजी केली. उनादकट यानं चार षटकात 30 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. नटराजन यानं दोन फलंदाजांची शिकार केली. मयांक मार्केंडय यानं एक विकेट घेतली. पॅट कमिन्स यानेही एक विकेट घेतली, पण चार षटकात 55 धावा खर्च केल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget