IPL 2023 : हिटमॅन परतला! दोन वर्षानंतर रोहित शर्माने झळकावले अर्धशतक
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली.

Rohit Sharma scores his first IPL fifty in two years : दिल्लीने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. मागील दोन सामन्यात मुंबईची फलंदाजी ढासळली होती, पण आजच्या सामन्यात मुंबईच्या सलामी फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. खासकरुन रोहित शर्मा याने दमदार प्रदर्शन केले. रोहित शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. रोहित शर्माने याने 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या अर्धशतकाचे कौतुक होत आहे. मोक्याच्या क्षणी रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली.
रोहित शर्मा याने दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलेय. गेल्यावर्षी आणि यंदाही रोहित शर्मा याला मोठी खेळी करता आली नव्हती. गेल्यावर्षी तर मुंबईच्या संघाची अवस्थाही दैयनिय झाली होती. रोहित शर्मा याला आयपीएलमध्ये अखेर सूर गवसला आहे. दोन वर्षानंतर रोहितच्या बॅटमधून अर्धशतक निघालेय. रोहित शर्माने या अर्धशतकी खेळीमध्ये चार चौकार आणि चार षटकार लगावले. यामधील नॉर्जे याला लगावलेला षटकार तर डोळ्याचे पारणे फेडणारा होता. रोहित शर्मा आयपीएलच्या मागील दोन हंगामात फ्लॉप जात होता. त्याला मागील 24 डावात अर्धशतक झळकावता आले नव्हते. 25 व्या डावात रोहित शर्मा याच्या बॅटमधून अर्धशतक आलेय.
First IPL fifty for Rohit Sharma in 25 innings!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023
The long wait is finally over for The Hitman. pic.twitter.com/kFe0zu5Koe
The Hitman show!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023
Fifty in 29 balls by captain Rohit Sharma - a splendid display of hitting. The Hitman is back with runs. pic.twitter.com/bCe07lYV9F
147 किमी वेगाने आलेल्या चेंडूला सिमापार पाठवले -
रोहित शर्मा याने आज आक्रमक फलंदाजी केली. त्याने ललीत यादव, एनरिख नॉर्जे आणि मुकेश कुमार यांना गगनचुंबी षटकार मारले. यामधील एक षटकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माने एनरिख नॉर्जे याच्या 147 किमी वेगाने आलेल्या चेंडूला सिमापार पाठवले. हा शॉट इतका परफेक्ट होता... की बॅटला चेंडू लागल्यानंतर त्यावर षटकार असेच लिहिलेले होते. रोहित शर्माने एनरिख नॉर्जे याला मारलेला षटकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याचे कौतुक होतोय.
A six by Rohit Sharma on a 147.3kmph delivery - what a shot!pic.twitter.com/4EYkWddCDT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023




















