रोहितच्या शतकावर धोनीचे 3 षटकार ठरले भारी, मुंबई-चेन्नईच्या सामन्यात 'माही'ची खेळी एक्स फॅक्टर
Rohit Sharma IPL 100 : वानखेडेवर रंगलेल्या एल क्लासिको सामन्यात चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली.
MI vs CSK, IPL 2024: Rohit Sharma IPL 100 : वानखेडेवर रंगलेल्या एल क्लासिको सामन्यात चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने दिलेल्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्मानं शानदार शतकी खेळी केली. पण रोहित शर्माच्या शतकावर एमएस धोनीनं मारलेले तीन षटकार भारी पडले. होय.. चेन्नईच्या फलंदाजीवेळी एमएस धोनीनं चार चेंडूचा सामना करताना 20 धावांची खेळी केली. यामध्ये षटकारांची हॅट्ट्रीक केली होती. इतक्याच धावांच्या फरकानं चेन्नईने मुंबईचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या चार चेंडूवर धोनीनं 20 धावा केल्या होत्या. हाच दोन्ही संघातील फरक दिसून आला.
रोहित शर्मा एकटा लढला, शतक ठोकलं, पण...
चेन्नईविरोधात रोहित शर्माने एकट्यानं लढा दिला. रोहित शर्मा पहिल्या चेंडूपासून मैदानावर होता, त्यानं अखेरच्या चेंडूपर्यंत मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. रोहित शर्मानं 63 चेंडूमध्ये नाबाद 105 धावांची खेळी केली. पण रोहितची शतकी खेळी मुंबईला विजय मिळवून देऊ शकली नाही. रोहितचा अपवाद वगळता मुंबईच्या इतर फलंदाजांनी घोर निराशा केली. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टीम डेविड आणि रोमिरिओ शेफर्ड यांना मोठी खेळी करता आली नाही. दुहेरी धावसंख्याही पार करु शकले नाही. ईशान किशन 23 आणि तिलक वर्मा 31 यांना चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईच्या मथिशा पथिराणा याच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईचे दिग्गजही फ्लॉप ठरले. चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. हा तोच फरक आहे, एमएस धोनीने केलेल्या 20 धावा महत्वाच्या ऱल्या.
I. C. Y. M. I
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
It was some knock!
It was some HUNDRED!
It was not to be tonight but Rohit Sharma - Take A Bow 🙌 🙌
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #MIvCSK | @ImRo45 | @mipaltan pic.twitter.com/ARFd3GmMuI
धोनीची गेमचेंजर फलंदाजी -
42 वर्षीय धोनीनं शानदार फटकेबाजी करत चेन्नईची धावसंख्या 206 पर्यंत नेहली. धोनीनं अवघ्या चार चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 20 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धोनीने 500 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेल मिचेल याला बाद केले. त्यानंतर वानखेडेवर पुन्हा एकदा धोनी वादळ आलं. एमएस धोनीने हार्दिक पांड्याच्या पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार लगावले. हार्दिक पांड्याला चेंडूही टाकता येईना, अशी अवस्था झाली होती. चेन्नईचा संघ 200 धावांपर्यंत पोचणार की नाही? असा सवाल समालोचकांनी उपस्थित केला. पण धोनी असेल तर काहीच अशक्य नाही. धोनीने आल्या आल्या षटकाराने सुरुवात केली. त्यानंतर धोनीने षटकाराची हॅट्ट्रीकच केली. हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. धोनीने फक्त चार चेंडूवर 20 धावा वसूल केल्या. धोनीनं केलेल्या फटकेबाजीचाच फरक दिसून आला. त्याशिवाय मथिशा पथिराणा यानेही भेदक मारा करत चार विकेट घेतल्या.
This part of life is what we call HAPPINESS! 💛✨#ThalaDharisanam #MIvCSK 🦁💛 pic.twitter.com/Fjjg4hqy8y
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2024