एक्स्प्लोर

RCB vs RR : आरसीबीचं आव्हान संपलं,  नेमकी चूक कुठे झाली? पराभवाची प्रमुख कारणे 

IPL 2022 : जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय.

IPL 2022 : जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. क्वालिफायर 2 सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या बळावर 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने  सात गडी आणि 11 चेंडू राखून आरसीबीचा पराभव केला. आरसीबीचं पुन्हा एकदा प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. 15 वर्षात आरसीबीने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशा पडली. पण आरसीबीची नेमकी चूक कुठे झाली? पराभवाची कारणे काय?

 1. नाणेफेकीचा कौल - 
आरसीबीच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण नाणेफेक होय.. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजूचा हा निर्णय योग्य ठरला. प्रथम गोलंदाजी करताना गोलंदाजांना मदत मिळाली. खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता.. पण दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ झाली होती.. त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यामुळेच नाणेफेकीचा कौल सर्वात महत्वाचा होता.. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून आर्धी बाजी मारली होती.  

2. KGF चा फ्लॉप शो -
आरसीबीची केजीएफ म्हणजे कोहली, ग्लेन आणि फाफ ही तिकडी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली.. विराट कोहली 8 चेंडूत सात धावा, फाफ डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा तर ग्लेन मॅक्सवेल 13 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला..

3. जोस बटलरचं आरसीबीच्या गोलंदाजांकडे उत्तरचं नव्हतं -
राजस्थान रॉयल्सचा विस्फोटक फलंदाज जोस बटलर याच्यापुढे आरसीबीचे सर्व गोलंदाज अपयशी ठरली. बटलरने एकहाती सामना फिरवला. हसरंगाचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाजांना चोप मिळाला.. बटलरपुढे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. सिराज आणि शाहबाज अहमद महागडे ठरले... सिराजने दोन षटकात  31 तर शाहबाजने दोन षटकात 35 धावा खर्च केल्या.  

4. फिनिशिंग टच - 
रजत पाटीदारचा अपवाद वगळता आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फिनिशिंग करणारा कार्तिकही फ्लॉप ठरला.. त्यामुळे अखेरच्या सात षटकात आरसीबीने सहा गड्यांच्या मोबदल्यात फक्त 50 धावा जमावल्यात. आरसीबीच्या पराभवाचं हे एक प्रमुख कारण आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हेCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Feb 2025 : ABP MajhaGaja Marne Arrest : मकोकाअंतर्गत गजा मारणेला चौथ्यांदा अटक, 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीIndrajit Sawant Threat : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी, प्रशांत कोरटकरांविरधात गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Embed widget