RCB vs PBKS IPL Final 2025: ...तर एकही चेंडू न खेळता पंजाब किंग्स आयपीएलची ट्रॉफी जिंकणार; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला धक्का बसणार
RCB vs PBKS IPL Final 2025: पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते.

RCB vs PBKS IPL Final 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील आज अंतिम रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS IPL Final 2025) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघानी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब किंवा बंगळुरुच्या रुपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पावसामुळे सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला, त्यामुळे सामना रद्द करावा लागेल असे वाटत होते. कारण या सामन्यात राखीव दिवस नव्हता आणि जर सामना रद्द झाला तर पंजाब किंग्जला न खेळता अंतिम फेरीचे तिकीट मिळाले असते. कारण ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते, पण जर अंतिम फेरीत असे झाले तर ट्रॉफी कोणाला मिळेल?, याची माहिती समोर आली आहे.
📍 Narendra Modi Stadium, Ahmedabad
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
📸 The 2⃣ captains gear up for Final Face-off ❤️
𝗔𝗥𝗘. 𝗬𝗢𝗨. 𝗥𝗘𝗔𝗗𝗬? ⏳ #TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/WG0cS0iTVv
...तर एकही चेंडू न खेळता पंजाब किंग्स आयपीएलची ट्रॉफी जिंकणार-
आज नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यावर पावसाचा परिणाम होईल. आज 20 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे आणि सामन्यादरम्यानही पाऊस खेळात व्यत्यय आणू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या अंतिम फेरीत राखीव दिवस आहे. जर पावसामुळे सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही, तर सामना 4 जून रोजी खेळवला जाईल. राखीव दिवशी देखील म्हणजेच 4 जून रोजी देखील पावसामुळे सामना न होऊ शकल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजय घोषित केले जाईल. म्हणजेच पंजाब किंग्सला आयपीएल 2025 ची ट्रॉफी मिळेल.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचे नियम काय आहेत?
पावसामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यात अडथळा निर्माण झाला तर त्यासाठी 120 मिनिटे किंवा सुमारे दोन तासांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, जर थोडा वेळ पाऊस पडला तर सामना पूर्ण 20 षटकांचा खेळवण्यात येईल. त्यानंतरही, जर पाऊस सुरूच राहिला तर षटक कमी केले जातील. बीसीसीआय किमान 5 षटकांचा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून जो संघ चांगला खेळेल तो विजेता होईल. तसेच पाऊस सुरुच राहिल्यास राखीव दिवशी सामना खेळवण्यात येईल. मात्र राखीव दिवशी देखील पावसाने सामन्यात खोळंबा केल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजय घोषित केले जाईल.





















