एक्स्प्लोर

RCB Vs MI: IPL 2022: मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे.

LIVE

Key Events
RCB Vs MI: IPL 2022: मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

Background

RCB Vs MI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरू आणि मुंबई (Royal Challengers bangalore Vs Mumbai Indians) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरूनं तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, आपल्या खात्यात आणखी दोन गुण जमा करण्यासाठी बंगळुरूचा संघ संज्ज झालाय. 

आयपीएलमध्ये आजवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 17 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर आरसीबीला 12 सामन्यात विजय मिळवता आला आहे. पण यंदा बंगळुरुचा फॉर्म मुंबईपेक्षा अधिक चांगला असल्याने आजचा  सामना चुरशीचा होणार हे नक्की.

बंगळुरूचा संघ-
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, सिद्धार्थ कौल, छमा व्ही मिलिंद, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, जेसन बेहरेनडॉर्फ, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, अनेश्वर गौतम.

मुंबईचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी, जयदेव उनाडकट, फॅबियन अॅलन, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, टिम डेव्हिड, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान.

हे देखील वाचा-

23:31 PM (IST)  •  09 Apr 2022

मुंबईनं सलग चौथा सामना गमावला

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील आठराव्या सामन्यात बंगळुरुच्या संघानं सात विकेट्स राखून मुंबईला पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं 9 चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं. बंगळुरूच्या विजयात अनुज रावतनं महत्वाची भूमिका बजावली.

22:58 PM (IST)  •  09 Apr 2022

मुंबईविरुद्ध अनूज रावतची अर्धशतकी खेळी

मुंबईच्या संघानं दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं आतापर्यंत चांगली खेळी केली. दरम्यान, या सामन्यात बंगळुरूचा फलंदाज अनूज रावत अर्धशतक ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे. 

22:43 PM (IST)  •  09 Apr 2022

बंगळुरूची विजयाकडे वाटचाल, जिंकण्यासाठी 63 धावांची गरज

मुंबईनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. बंगळुरूनं 13 षटकात 92 धावा करून एक विकेट गमावली आहे. बंगळुरूला जिंकण्यासाठी 42 चेंडूत 60 धावांची गरज आहे. 

21:25 PM (IST)  •  09 Apr 2022

RCB Vs MI: मुंबईचं बंगळुरूसमोर 152 धावांचं लक्ष्य

पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सतराव्या सामन्यात मुंबईच्या संघानं बंगळुरूसमोर (RCB Vs MI) 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. 

21:15 PM (IST)  •  09 Apr 2022

IPL 2022: सुर्यकुमार यादवचं संयमी अर्धशतक

बंगळुरुविरुद्ध मुंबईचा संघ संघर्ष करत असताना सुर्यकुमार यादवनं अर्धशतक ठोकलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget