(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB Vs MI: सुर्यकुमार यादवनं मुंबईचा डाव सावरला, बंगळुरूला विजयासाठी 152 धावांची गरज
RCB Vs MI, IPL 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं.
RCB Vs MI, IPL 2022: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सतराव्या सामन्यात मुंबईच्या संघानं बंगळुरूसमोर (RCB Vs MI) 152 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 151 धावा केल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात धीमी झाली. तसेच सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूत कर्णधार रोहित शर्मानं त्याची विकेट गमावली. दरम्यान, फलंदाजी करण्यासाठी आलेला डेवाल्ड ब्रेविसलाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वानिंदु हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानं 11 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु, दहाव्या षटकात ईशान किशनही बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि पोलार्ड शून्यावर बाद होऊन माघारी परतले. रमनदीप सिंहलाही (6 धावा) या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर सुर्यकुमार यादवनं उनादकटला सोबत संघाची धावसंख्या 151 धावांवर पोहचवली.
बंगळुरूचा संघ-
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
मुंबईचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.
हे देखील वाचा-
- CSK vs SRH Top 10 Key Points : हैदराबादचा चेन्नईवर दमदार विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- Maharashtra Kesari 2022 : तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरकडे, अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटील विजयी
- RCB Vs MI: आरसीबीचा संघ आणखी मजबूत होणार, विस्फोटक फलंदाजाची संघात एन्ट्री; मुंबईसमोर मोठं आव्हान