(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB Team 2025 Players List : यंदाच्या IPL मध्ये RCB ची हवा! अनेक बाहुबली खेळाडू संघाच्या ताफ्यात; चेन्नई, मुंबईची दाणादाण उडणार?
आयपीएलच्या पुढील हंगामाचा लिलाव संपला आहे. सर्व संघांनी आपापल्या परीने सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न केला.
RCB Team 2025 Players List : आयपीएलच्या पुढील हंगामाचा लिलाव संपला आहे. सर्व संघांनी आपापल्या परीने सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) लिलावापूर्वी विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल या तीनच खेळाडूंना कायम ठेवले होते. पण लिलावात त्याने आपल्या जुन्या खेळाडूंना परत घेतले नाही आणि यावेळी त्याने नवीन संघ तयार केला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि विल जॅकसारख्या अष्टपैलू खेळाडूंना आरसीबीने सोडले.
मात्र, यावेळी त्यांनी फिल सॉल्टसारखा सलामीवीर विकत घेतला आहे, जो विराट कोहलीसोबत डावाची सलामी देऊ शकतो. अशा परिस्थितीत आरसीबीकडे चार तुफानी फलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा पर्यायही असेल. रजत पाटीदारला तिसऱ्या क्रमांकावर तर लियाम लिव्हिंगस्टोन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. यानंतर जितेश शर्मा यष्टिरक्षक फलंदाज बनू शकतो तर टीम डेव्हिड फिनिशर बनू शकतो. गेल्या हंगामात छाप पाडणाऱ्या स्वप्नील सिंग आणि कृणाल पंड्या यांचा अष्टपैलू म्हणून वापर केला जाऊ शकतो, जेणेकरून फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत उपलब्ध होऊ शकेल.
Presenting to you, the #ClassOf2025! 💪
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 26, 2024
A powerhouse of a squad with reliable batters, lethal bowlers, and ace all-rounders, Summer 2025 we’re coming in hot! ❤️🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPLAuction #BidForBold #IPL2025 pic.twitter.com/v4ywTyYh65
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडसह यश दयालला वेगवान गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवता येईल. अशा प्लेइंग इलेव्हनमध्ये आरसीबीकडे फलंदाजीत आठ आणि गोलंदाजीत किमान सहा पर्याय असतील. स्वस्तिक चिकारा आणि सुयश शर्मा यांचा प्रभावी खेळाडू म्हणून आरसीबी चांगला वापर करू शकते. स्वस्तिक विशेषतः चिन्नास्वामीवर वापरले जाऊ शकते कारण ते खूप मोठे फटके मारण्यासाठी पटाईत आहेत. लेगस्पिनर सुयशलाही युझवेंद्र चहलची कामगिरी करता येईल.
अशी असू शकते आरसीबीची प्लेइंग-11 - फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, स्वप्नील सिंग, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
इम्पॅक्ट प्लेअर : स्वस्तिक चिकारा/सुयश शर्मा
आरसीबीचा संपूर्ण संघ -
फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, स्वप्नील सिंग, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, स्वस्तिक चिकारा, सुयश शर्मा, देवदत्त पडिक्कल, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडगे, रोमारियो शेफर्ड, मोहित राठी, रसिक दार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी आणि अभिनंदन सिंग.