RCB Qualification Scenario: हैदराबाद-लखनौमधील सामना गमावेल तो...., चेन्नईचाही पराभव,आरसीबीचं नवं समीकरण
RCB Qualification Scenario : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर आणि हैदराबादच्या पराभवानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रंजक झाली आहे.
Royal Challengers Bengaluru : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानंतर आणि हैदराबादच्या पराभवानंतर प्लेऑफची शर्यत अधिक रंजक झाली आहे. मुंबई इंडियन्सने हैदराबादचा पराभव करत इतर संघाची संधी वाढवली आहे. आरसीबीच्या आशाही जिवंत राहिल्या आहेत. आज हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामन्यानंतरही प्लेऑफची समीकरणे तयार झाली आहे. आरसीबीचे प्लेऑफचं आव्हान जिवंत तर आहे, पण प्रवास खपूच किचकट असेल. आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा कायम आहे. पाहूयात, आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची नेमकी समीकरण काय आहेत.. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफसाठी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
आरसीबीसाठी आता काय समीकरण ?
प्लेऑफमध्ये पोहचण्यसाठी आरसीबीला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागले. आरसीबीने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होतील. पण इतक्यावर ते प्लेऑफमध्ये पोहचणार नाहीत. आरसीबीला सर्व सामन्यात विजय मिळवल्यानंतर इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे. आरसीबीचा संघ सध्या रामभरोसे आहे. चेन्नई सुपर किंग्सचे दोन सामने शिल्लक आहेत, यातील एका सामन्यात चेन्नईचा पराभव व्हावा लागेल. आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्येच एक सामना आहे. या सामन्याचा निकाल सर्वकाही ठरवेल.
त्याशिवाय आज लखनौ आणि हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. आज ज्या संघाचा पराभव होईल, तो संघ पुढील दोन सामन्यापैकी एक सामना हरायला हवा. जर असं झालं तर आरसीबीचे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी वाढतेय.
RCB's qualification scenario :
— Kohlified. (@123perthclassic) May 8, 2024
CSK needs to lose 1 of their next 2 games
The Loser of Today’s game (SRH vs LSG) needs to lose 1 of their last 2 games
RCB needs to win all games .
If RCB somehow manages to qualify , no one can stop us from winning IPL🔥 pic.twitter.com/fi1iCudhWa
आरसीबीचे तीन सामने कुणाविरोधात ?
आरसीबीचे सामने दिल्ली, पंजाब आणि चेन्नई यांच्याविरोधात राहिले आहेत. या संघांनाही प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान अधिक खडतर होऊव जातेय. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी निशाबाची साथ लागणार आहे. गेल्यावर्षीही आरसीबी याच स्थितीमध्ये होती, आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातचा पराभव करावाच लागणार होता, पण मोक्याच्या क्षणी आरसीबीनं नांगी टाकली अन् प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले.
9 मे रोजी आरसीबीचा सामना पंजाब किंग्सविरोधात होणार आहे. त्यानंतर 12 रोजी आरसीबी आणि दिल्ली यांच्यात लढत होणार आहे. 18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यात आमनासामना होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला या तिन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल.