एक्स्प्लोर

RCB vs GT : हार्दिक पांड्याची कर्णधाराला साजेशी खेळी, आरसीबीपुढे 169 धावांचे आव्हान

हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या आहेत.

RCB vs GT, IPL 2022 Marathi News : हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या आहेत. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 169 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. 

प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला शुभमन गिल अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यानंतर मॅथ्यू वेडही 16 धावा काढून बाद झाला. वृद्धीमान साहा 31 धावांवर धावबाद झाला. गुजरातची फलंदाजी ढासळत असताना हार्दिक पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने पहिल्यांदा डेविड मिलरच्या साथीने डाव सावरला. मिलर 25 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. मिलरनंतर तेवातियाही दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने राशिद खानच्या मदतीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने नाबाद 62 धावांची खेळी केली. तर राशिद खान याने सहा चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. राशिद खान आणि हार्दिक पांड्या यांनी 15 चेंडूत 36 धावांची भागिदारी करत फिनिशिंग टच दिला. 

हर्षल पटेलची दुखापत, गुजरातला फायदा
आरसीबीकडून जोश हेजलवूडने दोन विकेट घेतल्या. तर मॅक्सवेल आणि वानंदु हसरंगा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. त्याशिवाय इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. पहिल्या षटकानंतर हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाला होता. याचा फटका आरसीबीला अखेरच्या षटकात बसला... 

बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडचा तोल ढासळला, पॅड फेकले, बॅट आदळली 
प्रथम फलंदाजी करताना सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेड पायचीत झाला.. पंचांचा हा निर्णय मॅथ्यू वेडला पचला नाही.. त्याने तात्काळ DRS घेतला. तिसऱ्या पंचांनीही मॅथ्यू वेडला बाद दिले.. बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती... तो रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला... त्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये त्याने आपला राग बाहेर काढला... त्याने रागारागात पॅड फेकून दिले.. बॅट जोराने खाली मारली... हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.. त्याला काही जणांनी समजावण्याचा प्रयत्नही केला.. पण तोपर्यंत व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.. काही जणांनी त्याला अखिलाडीवृत्तीमुळे सुनावले... मॅथ्यू वेडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...

नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, दोन्ही संघात एक एक बदल -
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्त्वातील गुजरात संघाने 20 गुणांसह प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केलाय. पण फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीसाठी आजचा सामना करो या मरो असा आहे. आजच्या सामन्यात आरसीबीला विजय अनिवार्य आहे. निर्णायक सामन्यात आरसीबीच्या संघात एक मोठा बदल करण्यात आलाय. आरसीबीने मोहम्मद सिराजला वगळले आहे, त्याजागी सिद्धार्थ कौलला स्थान दिलेय. सिद्धार्थ कौल यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघातही एक बदल करण्यात आलाय. गुजरातच्या संघात लॉकी फर्गुसनचं पुनरागमन झालेय तर अल्झारी जोसेफला वगळण्यात आलेय. 

गुजरातची प्लेईंग 11 -
 शुभमन गिल, वृद्धीमान साहा (विकेटकिपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, आर साई किशोर, लॉकी फर्गुसन, मोहम्मद शामी, यश दयाल

आरसीबीची प्लेईंग 11 - 
विराट कोहली, फाफ डु प्सेसिस  (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल सोमरोर, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक(विकेटकिपर), हर्षल पेटल, वानंदु हसरंगा, सिद्धार्थ कौल, जोश हेजलवूड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget