एक्स्प्लोर

KKR vs RR : राजस्थानच्या संघात बोल्टची एन्ट्री, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

KKR vs RR : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

KKR vs RR : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  नीतीश राणा याच्या नेतृत्वातील कोलकाता संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. संजू सॅमसन याले प्लेईंग 11 मध्ये बदल केल्याची माहिती दिली. कोलकात्याच्या संघातही बदल करण्यात आलाय.  

संजू सॅमसनच्या नेतृत्वातील पिंक आर्मी आज कोलकात्याविरोधात दोन हात करणार आहे. मागील तीन सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता. पराभवाची हॅटट्रिक झाल्यानंतर संजू विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी मैदानात उतरले. राजस्थानने यंदाच्या हंगामात दणक्यात सुरुवात केली होती.. पण उत्तरार्धाकडे आयपीएल झुकल्यानंतर राजस्थानच्या कामगिरी निराशाजनक झाली.  मागील सामन्यात 214 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.. पण गोलंदाजांकडून कामगिरीत सातत्य दिसत नाही. युवा नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ सध्या दमदार फॉर्मात आहे. मागील दोन्ही सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात कोलकात्याने पंजाबचा पाच विकेटने पराभव केला होता. कोलकात्यासाठी जमेची बाजू म्हणजे आंद्रे रसेल फॉर्मात परतलाय. पंजाबविरोधात रसेल याने वादळी फलंदाजी केली होती. त्याशिवाय रिंकू सिंह फिनिशर म्हणून आपले काम चोख बजावत आहे. गोलंदाजीत हर्षित राणा याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याशिवाय सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती ही जोडी प्रभावी ठरत आहे. या जोडीला सुनील नारायण याची साथ आहे.  

कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेवन : 

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, नीतीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

KKR Impact Subs : सुयेश शर्मा, वैभर अरोरा, एन जगदीशन, लॉकी फर्गुसन, उमेश यादव

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन :

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमेयर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, केएम आसिफ, युजवेंद्र चहल 

RR Impact Subs : देवदत्त पडिक्कल, रियान पराग, एम अश्विन, नवदीप सैनी,  Donovan Ferreira 

दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय ?

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात आणि चेन्नई संघ आघाडीवर आहेत. कोलकाता आणि राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरली. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.. तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल.. 

KKR vs RR Head to Head : कोलकाता विरुद्ध राजस्थान हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 27 लढती झाल्या आहेत. आकडेवारी पाहिल्यास कोलकात्याचे पारडे जड असल्याचे दिसतेय. कोलकात्याने 27 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानला 12 सामन्यात विजय मिळवता आलाय.  एक सामन्याचा कोणताही निकाल लागला नव्हता.. राजस्थानविरोधात कोलकात्याची सर्वोच्च धावसंख्या 210 इतकी आहे. तर निचांक्की धावसंख्या 125 इतकी आहे. राजस्थानची कोलकात्याविरोधात 217 धावसंख्या सर्वोच्च आहे तर 81 निचांकी धावसंख्या आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget