Punjab Kings : श्रेया मोठा गेम झाला यार... पंजाबच्या 'या' 5 खेळाडूंनी तोडले प्रिती झिंटाचे दिल, तरी अजूनही फायनल खेळण्याची संधी
Punjab Kings Still Alive in IPL 2025 : आयपीएल 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला.

RCB beat Punjab Kings Qualifier 1 : आयपीएल 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवामुळे पंजाबचे आयपीएल स्वप्न संपुष्टात आलेले नाही. पंजाबकडे अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याची एक महत्त्वाची संधी आहे. या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ केवळ 101 धावांवर बाद झाला. RCB ने 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीत मजल मारली. सुयश शर्मा आणि जॉश हेजलवूड यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली.
𝙏𝙝𝙖𝙩'𝙨 𝙝𝙤𝙬 𝙮𝙤𝙪 𝙨𝙚𝙖𝙡 𝙖 𝙥𝙡𝙖𝙘𝙚 𝙞𝙣 𝙩𝙝𝙚 𝙛𝙞𝙣𝙖𝙡𝙨 ❤
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
🎥 Captain Rajat Patidar fittingly finishes off in style as #RCB are just one step away from the 🏆
Updates ▶ https://t.co/FhocIrg42l#PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/hXhslIqcDZ
परंतु, संघासाठी ही शेवटची संधी नव्हे. पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार आहे, जिथे त्यांचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 3 जून रोजी अंतिम फेरीत RCB शी भिडणार आहे.
सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आपण लढाई हरलो आहोत, युद्ध नाही. संघ अजूनही एकत्र आहे आणि आम्ही अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.” पंजाब किंग्जच्या चाहत्यांसाठी ही आशेची किरण आहे. एक विजय आणि संघ आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या शर्यतीत पुन्हा येईल.
Fallen, not finished! 💪🏻 pic.twitter.com/R5mkALa5wH
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 29, 2025
या सामन्यात श्रेयस अय्यरच्या शिलेदारांचा 'फ्लॉप शो' पाहायला मिळाला.
कर्णधार श्रेयस अय्यर अपयशी!
पंजाब किंग्जच्या खराब कामगिरीमागे त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यरचा मोठा हात होता. या सामन्यात फक्त 3 चेंडूत 2 धावा काढून श्रेयस अय्यर बाद झाला.
शशांक सिंगही ठरला 'फेल'
श्रेयस अय्यरप्रमाणेच पंजाब किंग्जचा स्टार फलंदाज शशांक सिंगही या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात शशांकने फक्त 5 चेंडूत 3 धावा काढून बाद झाला.
मुशीर खान शुन्यावर तंबुत...
पंजाबच्या फलंदाजीचा आणखी एक खलनायक त्यांचा मधल्या फळीतील फलंदाज मुशीर खान होता. मुशीर या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आला होता. पण हा खेळाडू खाते न उघडताच बाद झाला.
अर्शदीपचा गोलंदाजीत खराब दिवस
पंजाबचे जवळजवळ सर्व फलंदाज अपयशी ठरले, परंतु अर्शदीप सिंग गोलंदाजीतही काही विशेष करू शकला नाही. या सामन्यात अर्शदीपने दोन षटके टाकली आणि त्याने 10 च्या इकॉनॉमीने 20 धावा दिल्या. काइल जेमीसनला या विकेटवर आश्चर्यकारक स्विंग मिळत होता, पण अर्शदीप पूर्णपणे अपयशी ठरला.
प्रियांश आर्यचा 'फ्लॉप शो'
या संपूर्ण हंगामात पंजाब किंग्जसाठी सलामी देणाऱ्या प्रियांश आर्यने शानदार फलंदाजी केली आहे. परंतु तो क्वालिफायर - 1 मध्येही पूर्णपणे अपयशी ठरला. प्रियांशच्या बॅटने या सामन्यात फक्त 5 चेंडूत 7 धावांची खेळी केली. या सामन्यात तो आऊट होणारा पहिला फलंदाज होता.





















