DC, IPL 2022 : पृथ्वी शॉ रुग्णालयात, चेन्नईविरोधातील सामन्याआधी दिल्लीला मोठा धक्का
DC, IPL 2022 Marathi News : दिल्ली कॅपिट्लसची संकटे कमी होण्याची नाव घेत नाहीत. दिल्ली संघाच्या नेट बॉलरला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
DC, IPL 2022 Marathi News : दिल्ली कॅपिट्लसची संकटे कमी होण्याची नाव घेत नाहीत. दिल्ली संघाच्या नेट बॉलरला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल झालाय. चेन्नईविरोधातील सामन्याआधी दिल्लीच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी आली आहे. मागील सामन्यात पृथ्वी शॉ दुखापतीमुळे खेळला नव्हता. आता आज पृथ्वी रुग्णालयात दाखल आहे, त्यामुळे आजच्या सामन्यातही पृथ्वी शॉ उपलब्ध नसेल... पृथ्वीच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या अडचणी वाढल्यात....
चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता सामना होणार आहे. या सामन्याआधी पृथ्वी शॉने सोशल मीडियावर रुग्णालयात असल्याचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये पृथ्वी शॉ रुग्णालयाच्या बेडवर उपचार घेत असताना दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल झालोय. लकरच परतेल... असे कॅप्शन पृथ्वीने लिहिलेय.
Comeback soon, Shaw. pic.twitter.com/7iKGisuPcM
— Johns. (@CricCrazyJohns) May 8, 2022
दिल्ली संघाती एका नेट बोलरला कोरोना झाल्यामुळे हा सामना होईल की नाही? अशी चर्चा होती. पण नुकताच सर्व दिल्लीच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट समोर आला असून त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्पोर्ट्स तक या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. दरम्यान याआधी देखील दिल्ली संघातच कोरोनाची बाधा झाली होती. पण संबधित खेळाडू कोरोनातून सावरले देखील. त्यामुळे संघाचे सर्व सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवले गेले होते. पण आज सामन्याला काही तास शिल्लक असताना ही माहिती समोर आल्याने आजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभी राहत होती. यावेळी आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''आज सकाळी दिल्ली संघाची कोरोना चाचणी करताना एका नेट बॉलरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले आहे.'' पण आता इतर खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्याने सामना होणार असल्याचं समोर आलं आहे.
चेन्नई-दिल्ली आमने सामने
आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईने याठिकाणी 3 पैकी 2 सामने जिंकले असून दिल्लीकरांसाठी त्याचं आव्हान अवघड असेल. त्यात आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.