Preity Zinta and Glenn Maxwell : 'मॅक्सवेलशी लग्न केले नाहीस, म्हणूनच...' चाहत्याने ओलांडली मर्यादा! रागाच्या भरात प्रिती झिंटाची भली मोठी पोस्ट; म्हणाली, लिंगभेद थांबवा...
Preity Zinta and Glenn Maxwell News : पंजाब किंग्जची सह-मालक प्रिती झिंटा सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असताना एका चाहत्याने तिला असा प्रश्न विचारला की त्यामुळे खळबळ उडाली.

Preity Zinta and Glenn Maxwell : भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे 9 मे पासून आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले. आता ही स्पर्धा 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जची सह-मालक प्रिती झिंटा सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असताना एका चाहत्याने तिला असा प्रश्न विचारला की त्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रिती झिंटाला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. यासोबतच, ती आयपीएलमध्ये पंजाब किंग्जची सह-मालक आहे. प्रिती झिंटा एक्स वर लाईव्ह चॅटवर चाहत्यांशी बोलत होती, तेव्हा एका चाहत्याने तिला ग्लेन मॅक्सवेलबद्दल असा विचित्र प्रश्न विचारला, त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री संतापली. आणि त्या चाहत्याला चांगलेच खडसावले.
रागाच्या भरात प्रिती झिंटाची भली मोठी पोस्ट
ग्लेन मॅक्सवेलच्या खराब आयपीएल फॉर्मबद्दल बोलताना, वापरकर्त्याने प्रितीला विचारले, "मॅडम, मॅक्सवेलचे तुमच्याशी लग्न झालेले नाही, म्हणूनच तो तुमच्या संघाविरुद्ध चांगले खेळू शकत नाही?" त्यानंतर प्रिती झिंटा चांगलीच संतापली. तिने एक पोस्ट करत लिहिले की, "तुम्ही हा प्रश्न सर्व पुरुष संघ मालकांना विचाराल का, की हा भेदभाव फक्त महिलांबद्दल आहे? मी क्रिकेटमध्ये येईपर्यंत मला कधीच माहित नव्हते की महिलांसाठी कॉर्पोरेट सेटअपमध्ये टिकून राहणे किती कठीण आहे.
पुढे प्रिती झिंटाने लिहिले की, मला खात्री आहे की तुम्ही हा प्रश्न मस्करीमध्ये विचारला आहे, परंतु तुम्ही काय प्रश्न विचार आहे हे पाहा. कारण जर तुम्हाला खरोखर समजले असेल की तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय, हे समजून घ्या. जर तुम्हाला ते खरंच समजलं, तर तुमच्या लक्षात येईल, की ते योग्य नाही. मला वाटतं मी 18 वर्षांपासून मेहनत करून माझी छाप पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्लीज मला योग्य तो आदर द्या आणि हा लिंगभेद थांबवा. धन्यवाद.'
Will you ask this question to the male team owners of all teams, or is this discrimination just towards the women? I never knew how difficult it is for women to survive in corporate setups until I got into cricket. I’m sure you asked this question out of humour, but I hope you… https://t.co/cBX4SbqAwS
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 13, 2025
आयपीएल 2025 मध्ये मॅक्सवेलची कामगिरी
पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची या हंगामात खूपच निराशाजनक कामगिरी राहिली आहे. आयपीएल मेगा लिलावात मॅक्सवेलला पंजाबने 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले आणि या खेळाडूने या स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने फक्त 48 धावा केल्या.
हे ही वाचा -





















