Kieron Pollard retirement : मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Kieron Pollard retirement : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Kieron Pollard retirement : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. बुधवारी पोलार्डने आपल्या 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पोलार्डने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली... पोलर्डने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, "10 वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्टविंडिज संघात खेळण्याचे माझं स्वप्न होतं. 15 वर्षांपासून टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आहे. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन खेळाडूंना संघात नक्कीच जागा होण्याचा मार्ग मोकळा होईल. "
वेस्ट विंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि मर्यादित षटकाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मागील 15 वर्षांपासून पोलार्ड वेस्ट विडिंज संघाचा सदस्य आहे. सध्या पोलार्ड भारतामध्ये सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत व्यस्त आहे. पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करतोय.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सनेही मिश्किल ट्विट करत पोलार्डच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे... मुंबई पलटनचा आवडता पॉली तात्या knock कुठला? असं ट्विट मुंबई इंडियन्सने केले आहे.
𝐓𝐡𝐞 𝐋𝐋𝐎𝐑𝐃 has announced his retirement from international cricket.
— Mumbai Indians (@mipaltan) April 20, 2022
Paltan, favourite Polly तात्या knock कुठला? 🌴💙#OneFamily @KieronPollard55 @ICC pic.twitter.com/H8IVZMXAd0
पोलार्डने वेस्ट विंडिजसाठी 123 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 2706 धावा आणि 55 विकेट घेतल्या आहे. पोलार्डला जगातील सर्वोत्कृष्ट टी 20 खेळाडू म्हणून ओळखलं जाते. आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये पोलार्डने 101 सामन्यात 135.14 च्या स्ट्राइक रेटने 1568 धावा चोपल्या आहेत. पोलार्डने अखेरचा आंतरारष्ट्रीय टी 20 सामना फेब्रुवारी 2022 मध्ये बारताविरोधात खेळला आहे. यामध्ये पोलार्डने वेस्ट विडिंजच्या संघाचं नेतृत्व केले होते.
पोलार्डने 587 टी 20 सामन्यात 11 509 धावा चोपल्या आहेत. सर्वाधिक टी 20 धावा चोपणाऱ्या खेळाडूंमध्ये पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने जगातील अनेक टी 20 लीगमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.