IPL 2024 : सॉल्टचा झेल पाहून धोनीही दंग होईल, सुपरमॅनसारखा हेवत झेपवत घेतला शानदार कॅच VIDEO
KKR vs LSG, IPL 2024 : ईडन गार्डन मैदानावर श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाइट रायडर्सनं लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेटनं दारुण पराभव केला.
KKR vs LSG, IPL 2024 : ईडन गार्डन मैदानावर श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाइट रायडर्सनं लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेटनं दारुण पराभव केला. कोलकात्यानं लखनौला 161 धावांवर रोखलं. हे आव्हान कोलकात्यानं आठ विकेट राखून सहज पार केले. कोलकात्याच्या या विजयात फलंदाज आणि गोलंदाजाप्रमाणेच फिल्डर्सचेही मोलाचं योगदान ठरलं. कोलकात्याकडून आज एकही झेल सोडला नाही. रमनदीप यानं हवेत झेपवत शानादार झेल घेतला. दुसरीकडे विकेटच्या मागे फिलीप सॉल्ट यानेही सुपरमॅनप्रमाणेच झेल घेतला. फिलीप सॉल्ट यानं घेतलेला झेल पाहून धोनीही चकीत होईल, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली. सॉल्ट यानं घेतलेला झेल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर फलंदाज फिल सॉल्टने चमत्कारीक झेल घेतला. त्याने विकेटच्या मागे असा अप्रतिम झेल घेतला की सगळेच अवाक् झाले. फिलीप सॉल्ट हवेत झेपवला अन् एका हाताने हा करिष्माई झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फिल सॉल्ट झाला सुपरमॅन
कोलकाता नाईट रायडर्ससाठी वरुण चक्रवर्ती हा 12 वं षटक घेऊन गोलंदाजीला आला होता.लखनौ सुपर जायंट्सची धावगती मंदावली होती, त्यामळे फलंदाज वेगानं धावा काढण्यासाठी प्रयत्न करत होते. 12 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिस स्ट्राइकवर होता. स्टॉयनिसने एक धाव घेण्यासाठी चेंडूला मारला, पण बॅटची कड घेतली. पहिल्या स्लीपमधून चेंडू सीमापार जाईल, असं वाटलं होतं. पण अशा स्थितीत यष्टीरक्षक फिलीप सॉल्टने विकेटच्या मागून कोणतीही चूक केली नाही. त्याने एका हाताने हवेत झेपवत अप्रतिम झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सॉल्ट याल नेटकऱ्यांनी सुपरमॅन अशी उपाधी दिली.
Salt, swadanusaar 🤌🧂#KKRvLSG #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/tTVfTnnA3A
— JioCinema (@JioCinema) April 14, 2024
कोलकात्याचा लखनौवर सहज विजय, 2 गुणांची कमाई -
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकात्याच्या भेदक माऱ्यापुढे लखनौनं ठरावीक अंतरावर विकेट फेकल्या. ईडन गार्डन मैदानावर कोलकात्यानं लखनौला फक्त 161 धावांवर रोखलं. त्यानंतर हे आव्हान आठ विकेट राखून सहज पार केले. कोलकात्याकडून फिलीप साल्ट यानं शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय मिचेल स्टार्क यानं तीन विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्यानं लखनौला पहिल्यांदाच पराभूत केले. कोलकात्यानं या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोलकात्याचा हा चौथा विजय ठरला.