PBKS vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादचा पंजाबवर 8 विकेटने विजय
PBKS vs SRH Live : हैदराबादला अद्याप आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
LIVE
Background
IPL 2023, Match 14, PBKS vs SRH : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्या लढत पाहायला (PBKS vs SRH IPL 2023 Match 14) मिळणार आहे. हैदराबादमध्ये 9 एप्रिल रोजी, रविवारी राजीव गांधी स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचा हा तिसरा सामना असेल. हैदराबाद संघाला अद्याप खातं उघडला आलेलं नाही. तर पंजाब किंग्स संघाने दोन्ही सामन्यांत विजयी कामगिरी कायम राखली आहे.
PBKS vs SRH Match 14 Preview : पंजाब विरुद्ध हैदराबाद लढत
सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि या दोन्ही संघाचा आयपीएल 2023 मधील हा तिसरा सामना असेल. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात कोलकाताचा पराभव केला तर, दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. दुसरीकडे हैदराबाद संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. हैदराबाद सनरायजर्स संघाचा पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून पराभव पत्करावा लागला.
PBKS vs SRH, Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारडं जड दिसून आलं आहे. 19 सामन्यांपैकी हैदराबाद संघाने 13 सामने तर पंजाब संघाने 6 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.
IPL 2023 Match 14 : कधी आणि कुठे होणार सामना?
पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात 9 एप्रिल रोजी रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
हैदराबादचा पंजाबवर 8 विकेटने विजय
हैदराबादचा पंजाबवर 8 विकेटने विजय
राहुल त्रिपाठीचा झंझावात, हैदराबादची विजयाकडे कूच
राहुल त्रिपाठीचा झंझावात, हैदराबादची विजयाकडे कूच
हैदराबादला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल तंबूत
हैदराबादला दुसरा धक्का, मयांक अग्रवाल तंबूत
हैदराबादला पहिला धक्का, हॅरी ब्रूक बाद
हैदराबादला पहिला धक्का, हॅरी ब्रूक बाद
पंजाबची 143 धावांपर्यंत मजल
धवनच्या 99 धावांच्या खेळीच्या बळावर पंजाबने 143 धावांपर्यंत मजल मारली.