Rishabh Pant: रिषभ पंतचं 454 दिवसांनंतर कमबॅक, दिल्लीचं नेतृत्त्व करणार, चाहत्यांची प्रतीक्षा संपली
IPL 2024:आयपीएलमधील दुसरी लढत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. या लढतीत दिल्लीचा कॅप्टन म्हणून रिषभ पंतनं कमबॅक केलं आहे.
नवी दिल्ली : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) पर्वाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडली.चेन्नईनं 6 विकेटनं मॅच जिंकत आयपीएलची विजयी सुरुवात केली आहे. आज आयपीएलमधील दुसरी मॅच दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात होत आहेत. पंजाब किंग्जनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टीम इंडियाचा विकेटकीपर आणि दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंत कमबॅक करणार आहे.
रिषभ पंत 454 दिवसांनंतर मैदानावर?
टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. तो दिवस 30 डिसेंबर 2022 चा होता. या दिवशी अचानक बातमी आली ती म्हणजे रिषभ पंतच्या लक्झरी कारचा अपघात झाल्याची, यामुळं एकच खळबळ उडाली होती.या भीषण अपघातातून रिषभ पंत थोडक्यात वाचला होता. या अपघातात रिषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळं तो पुन्हा उभा राहू शकेल की नाही असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात निर्माण झाला होता.
रिषभ पंतवरील संकटाच्या आणि अडचणीच्या काळात भारतीय क्रिकेट कंट्रोल, नॅशनल क्रिकेट अकादमी त्याच्या सोबत उभे राहिले. कठोर परिश्रमानंतर रिषभ पंत आता 454 दिवसांनंतर मैदानावर उतरला आहे. रिषभ पंतवर दिल्ली कॅपिटल्सनं विश्वास ठेवत नेतृत्त्वाची जबाबदारी दिली आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये दिल्लीचा कॅप्टन म्हणून तो कमबॅक करेल.
आयपीएलसाठी बीसीसीआयनं रिषभ पंतला विकेटकीपर म्हणून खेळण्याची परवानगी दिली आहे. यानंतर दिल्लीनं त्याला कॅप्टन केलं. जूनमधये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रिषभ पंतला टीम इंडियात संधी मिळते का हे पाहावं लागेल.
रिषभ पंतचं आयपीएल करिअर
रिषभ पंतनं आयपीएलमध्ये 98 मॅच खेळल्या आहेत. रिषभ पंतच्या नावावर एका शतकाची देखील नोंद आहे. रिषभनं आयपीएलमध्ये 34.61 च्या सरासरीनं आणि 147.97 च्या स्ट्राइक रेटनं 2838 धावा केल्या आहेत. रिषभ पंच्या नावावर एका शतकाची आणि 15 अर्धशतकांची नोंद आहे.
रिषभच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण
रिषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 ला अपघात झाल्यानंतर तो क्रिकेटपासून दूर होता. वैद्यकीय उपचार आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रिषभ पंतनं क्रिकेट खेळण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. आजच्या मॅचमध्ये रिषभ पंतनं कमबॅक केलं असल्यानं त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
संबंधित बातम्या :
गब्बरनं नाणेफेक जिंकली, पंतचा दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीच्या खेळाडूला विराट कोहली काय बोलून गेला?; नेटकरीही संतापले