गब्बरनं नाणेफेक जिंकली, पंतचा दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2024 PBKS vs DC : पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंतचा दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
IPL 2024 PBKS vs DC : पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऋषभ पंतचा दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंत तब्बल दीड वर्षानंतर मैदानावर परतणार आहे. दिल्लीच्या ताफ्यात मिचेल मार्श, डेविड वॉर्नर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. तर पंजाबमध्ये शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन सारखे दर्जेदार खेळाडू आहे. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघामध्ये दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे.
दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
पंजाब किंग्सचे 11 शिलेदार :
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आज कोण कोण? :
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे.
हेड टू हेड आकडे काय सांगतात ?
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यामधील लढत नेहमीच चुरशी झाली आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 32 सामने झाले असून त्यात दिल्ली आणि पंजाबने 16-16 असा विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून कोण आघाडी घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
पंजाब किंग्सचे घरचे मैदान बदलले-
Delhi Capitals Vs Punjab Kings: आयपीएल 2024 पासून पंजाबचे घरचे मैदान बदलले आहे. आतापर्यंत पंजाबचा संघ मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळत होता, पण आता त्यांचे सामने महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमवर होणार आहेत. त्याची पायाभरणी 2008 साली झाली. त्याची प्रेक्षक क्षमता अंदाजे 33000 आहे. मात्र, त्यात अद्याप एकही मोठा सामना खेळला गेला नाही आणि पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना हा पहिलाच मोठा सामना असेल. थोड्याच वेळात टॉस होणार आहे.