एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PBKS vs CSK, Top 10 Key Points : चुरशीच्या सामन्यात पंजाबचा चेन्नईवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

PBKS vs CSK, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) संघात पाहायला मिळाली. यावेळी पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला. सामन्यात अंबाती रायडूच्या तुफानी खेळीने सर्वांचीच मनं जिंकली, फक्त अंबाती सामना जिंकू शकला नाही. पंजाबने दिलेल्या 188 धावांचे लक्ष्य पार करताना चेन्नईचा संघ 176 धावाच करु शकल्याने 11 धावांनी चेन्नईचा पराभव झाला. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

PBKS vs CSK 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे.पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही चेन्नईचा संघ सामना जिंकू शकला नाही. त्यांना 11 धावांनी सामना गमवावा लागला.
  2. सामन्याचा विचार केल्यास शिखर धवनने केलेल्या 88 धावांच्या जोरावरच पंजाबने चेन्नईसमोर 188 धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याच्या उत्तरात अंबातीने केलेल्या 78 धावांच्या तुफान खेळीमुळे सामना चुरशीचा झाला पण पराभव अखेर चेन्नईचाच झाला. 
  3. सर्वात आधी सामन्यात नाणेफेकीनंतर चेन्नई सुपरकिंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. पण शिखरने एकहाती झुंज दिली.
  4. शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. त्यानंतर 42 धावा करुन दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत 32 चेंडूत 42 धावा करुन भानुका बाद झाला.
  5. शिखरने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या.
  6. 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. पण ऋतुराजने बराच काळ क्रिजवर टिकून राहून संघाला सावरलं, अखेर तो 30 धावा करुन बाद झाला. 
  7. त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या.
  8. पण रबाडाने रायडूचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. त्यामुळे रबाडा गेमचेंजर ठरला.
  9. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला. 
  10. अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जाडेजाने एक षटकार लगावला, पण तोवर फार उशीर झाला होता आणि हातात चेंडू शिल्लक नसल्याने चेन्नईने सामना 11 धावांनी गमावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget