एक्स्प्लोर

PBKS vs CSK, Match Highlights : अंबातीची दमदार झुंज व्यर्थ; पंजाबकडून चेन्नईचा 11 धावांनी पराभव

IPL 2022, PBKS vs CSK : पंजाब संघाने दिलेलं 188 धावांचं लक्ष्य चेन्नई पार करु शकली नाही. 20 षटकात त्यांनी 176 धावाच केल्या.

PBKS vs CSK : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत चुरस होती. पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला. सामन्यात आधी फलंजाजी करणाऱ्या पंजाबने 187 धावा करत 188 धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले होते. हे पार करताना चेन्नईकडून अंबाती रायडूने एक दमदाऱ अशी 78 धावांची खेळी केली पण अखेर चेन्नईचा संघ 11 धावांनी पराभूत झाला. 

सर्वात आधी सामन्यात नाणेफेकीनंतर चेन्नई सुपरकिंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अगदी चोख गोलंदाजी केली. त्यांनी बऱ्याच षटकापर्यंत पंजाबच्या फलंदाजांना रोखून धरलं. सामन्यात सुरुवातीलाच पंजाबने त्यांचा कर्णधार मयांकला (Mayank Agarwal) 37 धावांवर गमावलं. त्यानंतर सलामीवीर शिखरने भानुका राजपक्षासोबत एक मोठी आणि भक्कम भागिदारी रचली. त्यानंतर 42 धावा करुन दोन चौकार आणि दोन षटकार ठोकत 32 चेंडूत 42 धावा करुन भानुका बाद झाला. पण शिखऱ क्रिजवर कायम होता. त्याने अखेरपर्यंत झुंज देत 59 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 88 धावा केल्या. यावेळी लियाम यानेही सात चेंडूत 19 धावांची महत्त्वाची खेळी केली. ज्यामुळे पंजाबने 187 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

अंबातीची झुंज व्यर्थ

188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाचे फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते. एक-एक फलंदाज बाद होत होता. ऋतुराजने काही काळ डाव सांभाळला पण तोही 30 धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या अंबाती रायडूने एका दमदार खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 39 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोक 78 धावा केल्या. पण रबाडाने त्याचा महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्याची दिशा बदलली. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकला खरा पण अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद होताच, सामना चेन्नईकडून पंजाबच्या दिशेने झुकला. त्यानंतर जाड़ेजाने एक षटकार लगावला, पण तोवर फार उशीर झाला होता आणि हातात चेंडू शिल्लक नसल्याने चेन्नईने सामना 11 धावांनी गमावला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget