CSK vs KKR: 'मला कुटुंबाचीही साथ मिळत नाही', केकेआरच्या चक्रवर्तीने मांडली व्यथा, धोनीसोबत आहे कनेक्शन
CSK vs KKR: केकेआरने लागोपाठ पहिले 3 सामने जिंकले होते. चौथ्या सामन्यात चेन्नईने केकेआरचा विजयरथ रोखला.

CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kinghs) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात काल सामना झाला. या सामन्यात चेन्नईने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. केकेआरने लागोपाठ पहिले 3 सामने जिंकले होते. चौथ्या सामन्यात चेन्नईने केकेआरचा विजयरथ रोखला.
कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम खेळताना 137 धावा केल्या होत्या, दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी एका बाजूला विकेट्स रोखून ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला धावफलक सुरू ठेवला. चेन्नईने 18 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या 67 धावांच्या नाबाद अर्धशतकाने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. कोलकात्याकडून खेळत असला तरी त्याचे कुटुंब त्याच्या विरोधी संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित होते, असं वरुणने सांगितले.
वरुण चक्रवर्ती नेमकं काय म्हणाला?
वरुण चक्रवर्ती सामन्यानंतर म्हणाला, "माझे संपूर्ण कुटुंब सामना पाहण्यासाठी चेपॉक स्टेडियमवर आले होते, परंतु ते सर्व चेन्नईच्या समर्थनार्थ पिवळ्या जर्सी घालून आले होते." महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलमधील कर्णधारपद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या यशाने संघाचा चाहतावर्ग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. वरुण चक्रवर्तीनेही सांगितले की, खेळपट्टी नीट न समजणे हेच संघाच्या पराभवाचे कारण बनले.
Varun is saying, "His entire family came to watch game at Chepauk but all of them are in yellove." pic.twitter.com/ObNgg7G8p6
— ` (@WorshipDhoni) April 9, 2024
कोण कुठल्या स्थानी, पाहा आयपीएलचे Latest Points Table
राजस्थान रॉयल्स अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 4 सामने खेळले असून या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाताने चार सामन्यात 3 विजय मिळवला आहे. तर आज चेन्नईविरुद्ध पराभवाचा त्यांना सामना करायला लागला. कोलकाताचे 6 गुण आहेत. लखनौही 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, तर चेन्नईने आजच्या विजयासह गुणतालिकेत चौथं स्थान कायम ठेवलं आहे. चेन्नईचा एकुण 5 सामन्यात 3 विजय आणि 2 पराभव झाला आहे. हैदराबाद पाचव्या क्रमांकावर असून पंजाब सहाव्या स्थानी आहे. हैदराबाद आणि पंजाबचे 4 गुण आहेत. गुजरात सातव्या क्रमांकावर, मुंबई आठव्या क्रमांकावर, बंगळुरु नवव्या स्थानी असून दिल्लीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या:
IPL 2024: आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!





















