रोहित-बुमराहची कॅप्टनविरोधात फिल्डिंग, पांड्याविरोधात तक्रार, मुंबई काय निर्णय घेणार ?
Mumbai Indians : आयपीएलचा 17 वा हंगाम मुंबईसाठी खूपच निराशाजनक राहिलाय. पाचवेळा चषकावर ना कोरणारा मुंबईचा संघ आयपीएल 2024 मधून बाहेर गेलाय.
Mumbai Indians, IPL 2024 : आयपीएलचा 17 वा हंगाम मुंबईसाठी खूपच निराशाजनक राहिलाय. पाचवेळा चषकावर ना कोरणारा मुंबईचा संघ आयपीएल 2024 मधून बाहेर गेलाय. मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर संघातील वातावरणही बिघडल्याचं समोर आले आहे. हार्दिक पांड्याविरोधात मुंबईच्या सिनियर खेळाडूंनी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचा संघ दोन गटामध्ये विभागाला आहे. इंडियन्स एक्स्प्रेसनं याबाबतचे वृत्त दिले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी हार्दिक पांड्याच्या स्वभावावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही प्रमुख खेळाडूंनी हार्दिक पांड्याची कोचिंग स्टाफकडे तक्रारही केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत कोचिंग स्टाफकडे नाराजी व्यक्त केली आहे. संघातील सिनियर खेळाडूंच्या तक्रारीनंतर मुंबई इंडियन्स काही निर्णय घेणार का? याची जोरदार चर्चा सुरु आहे.
हार्दिक पांड्याची तक्रार कुणी केली ?
इंडियन्स एक्स्प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांनी एका सामन्यानंतर कोटिंग स्टाफसोबत बैठक केली. या बैठकीमध्ये संघाच्या खराब कामगिरीवर त्यांनी चर्चा केली. त्यावेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाबद्दलही चर्चा झाली. संघातील अनेक खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाच्या शैलीवर नाराज आहेत.
तिलक वर्मावर प्रश्न उपस्थित करत फसला पांड्या -
दिल्ली कॅपिटल्सविरोधातील पराभवानंतर हार्दिक पांड्यानं तिलक वर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला. पांड्याच्या मते तिलक वर्माला आणखी वेगवान खेळायला हवं होते. क्रिकेटप्रति त्याला जागरूकता दाखवायला हवी, जिथं आमची चूक झाली. त्यामुळेच आमचा पराभव झाला. पण खरं तर त्या सामन्यात मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला होता.
Mumbai Indians' key players recently conveyed to the coaching staff that there was a lack of buzz in the dressing room and the reason was Hardik Pandya's leadership style. (Devendra Pandey from Indian Express). pic.twitter.com/XSm2JM5tFF
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 9, 2024
दिग्गजांकडून पांड्यावर निशाणा -
मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीवर अनेक माजी खेळाडूंनी हार्दिक पांड्यावर टीका केली. समालोचक आणि माजी क्रिकेटपट्टूंनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर निशाणा साधला. इरफान पठाण यानं उघडपणे पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. तर मायकल क्लाकर्कच्या मते मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडले आहेत. ते एकसंघ म्हणून खेळत नाहीत.
MUMBAI INDIANS BECOMES THE FIRST TEAM TO KNOCK-OUT OF IPL 2024....!!! pic.twitter.com/H0OMQD13zk
— Johns. (@CricCrazyJohns) May 8, 2024