Dhoni Injured : धोनीला दुखापत; चेन्नईच्या फॅन्सचं टेन्शन वाढलं; पुढच्या सामन्याला मुकणार?
MS Dhoni Injury Update : राजस्थान विरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीला गुडघ्याच्या दुखापती त्रस्त असल्याचं दिसून आलं. आता चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माहीच्या दुखापतीबाबत ताजी माहिती दिली आहे.
MS Dhoni nursing Knee Injury : चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) गुडघ्याला दुखापत झाली आहे. 12 एप्रिल रोजी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीला गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचं दिसून आलं. त्यामुळे चाहते धोनीबाबत चिंत व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी माहीच्या दुखापतीबाबत ताजी माहिती दिली आहे.
MS Dhoni Injury Update : चेन्नईच्या फॅन्सचं टेन्शन वाढलं
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं की, कर्णधार महेंद्र सिंह धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चार वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या सीएसकेला राजस्थान रॉयल्सकडून शेवटच्या चेंडूच्या रोमांचक लढतीमध्ये तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर चेन्नई संघाचे कोच फ्लेमिंग यांन मीडिया मुलाखतीत कॅप्टन कूलच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.
IPL 2023: MS Dhoni nursing a knee injury, reveals CSK head coach Stephen Fleming
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2023
Read @ANI Story | https://t.co/j7SAFeqPUY
#MSDhoni #CSKvsRR #RRvsCSK #IPL2023 #CricketTwitter pic.twitter.com/hhu3gvuzU9
MS Dhoni Injury Update : धोनीच्या गुडघ्याच्या दुखापत
चेन्नई संघाचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं की, धोनीला गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. या दुखापतीमुळे त्याच्या धावण्याच्या क्षमतेवर परिणाम दिसून येत आहे. विकेट्स दरम्यान धावण्यात त्यांना अडथळे येत आहेत. याच कारणामुळे धोनी बुधवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पूर्ण क्षमतेने धावा काढू शकला नव्हता. धोनी आयपीएल सुरु होणापूर्वी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त दिसून आला आहे. चेन्नईतील प्री-सीझन कॅम्पमध्ये धोनी गुडघ्यावर पट्टी बांधलेला दिसला होता.
MS Dhoni Injury Update : कर्णधार धोनी पुढच्या सामन्याला मुकणार?
दरम्यान, फ्लेमिंग यांनी धोनीबाबत विश्वास व्यक्त करत सांगितलं आहे की, ''चेन्नई संघाचा कर्णधार त्याच्या दुखापतीचा सामना करेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील.'' धोनीच्या तब्येतीबद्दलची चाहत्यांची चिंता दूर करत फ्लेमिंग यांनी म्हटलं की, "तो सामन्यात फॉर्ममध्ये परतण्यासाठी काम करतोय आणि तो चांगला खेळत असल्याचं तुम्ही पाहू शकता. त्यामुळे तो स्वत:ला सांभाळून योग्य व्यवस्थापन करतो याबद्दल आम्हाला नेहमीच आत्मविश्वास आहे.''
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : आयपीएलमध्ये धोनीचा नवा विक्रम, सर्वाधिक खेळाडू धावबाद करण्याच्या यादीत 'या' क्रमांकावर