MI vs CSK: धोनीने गिफ्ट केला बॉल, 'थाला'च्या प्रेमानं चाहत्याचा आनंद गगनात मावेना!
MI vs CSK, IPL 2024 : धोनीनं चार चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 20 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धोनीने 500 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या.
MI vs CSK, IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी पुन्हा एकदा फिनिशर म्हणून शानदार कामगिरी करतोय. 42 वर्षीय धोनीनं 20 व्या षटकात शानदार फटकेबाजी करत चेन्नईची धावसंख्या 200 पार पोहचवली. धोनीनं चार चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 20 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर धोनीने 500 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. धोनी फलंदाजी करायला आला तेव्हा आख्खं वानखेडे स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरु होता. धोनी षटकारांची हॅट्ट्रीक करुन परत होता, त्यावेळी चाहत्यांना त्यानं एक आनंदाचा धक्का दिला. धोनीनं स्टेडियममधील एका चाहत्याला चेंडू भेट दिला. धोनीनं दिलेला चेंडू घेतल्यानंतर चाहत्याचा आनंद गगनात मावला नाही. सोशल मीडियावर धोनीचा हा अनोखा अंदाज चर्चेत आहे. नेटकऱ्यांकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक करण्यात येतेय.
एमएस धोनीच्या झंझावती 20 धावांच्या बळावर चेन्नईने 206 धावांपर्यंत मजल मारली. ताबोडतोड खेळी केल्यानंतर धोनी ड्रेसिंग रुमकडे पतरत होता, पण त्यावेळी त्यानं चेंडू भेट देत विरोधकांचेही मन जिंकलं. ड्रेसिंग रुमकडे परत जाताना धोनीनं उपस्थित चाहत्याला आपल्याकडील चेंडू भेट दिला. याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धोनीनं ज्या चाहत्याला चेंडू भेट दिला, त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल.
धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मैदानावर आला होता. त्यावेळी चेन्नईची धावसंख्या 186 इतकी होती. धोनीने चार चेंडू खेळत 20 धावांची खेळी केली. धोनीनं सलग तीन षटकार मारत हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडून काढली. धोनीने हार्दिक पांड्याला 500 च्या स्ट्राईक रेटने चोपले. षटकाराची हॅट्ट्रीक मारुन परत जाताना धोनीनं चिमुकल्याला चेंडू भेट दिला. याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
He Came.
— 𝑄𝑢𝑒𝑒𝑛~𝑃𝐻♡ (@RealQueenPH) April 14, 2024
He Conquered.
He left.
- MS Dhoni, The Man, The Myth, The Legend. 🐐#MSDhoni | #ChennaiSuperKings | #IPL2024 | #CSKvsMI | #WhistePodu pic.twitter.com/yqGoL1KnLH
यंदाच्या हंगामात धोनीचा आक्रमक अंदाज, 236 च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा -
42 वर्षीय धोनी पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेत आहे. धोनी आयपीएल 2024 मध्ये 236 च्या स्ट्राईक रेटने धावा काढत आहे. यंदाच्या हंगामात धोनी वेगवेगळ्या क्रमांकावर फंलदाजीला येत आहे. धोनी फक्त अखेरच्या षटकात फलंदाजीला येत आहे. धोनीने यंदाच्या हंगामात सहा डावात 59 धावा केल्या आहेत. पण धोनीने यासाठी फक्त 25 चेंडू घेतले आहे. धोनीचा यंदाचा स्ट्राईक रेट 236 इतका आहे. धोनीने यंदाच्या हंगामात सहा षटकार आणि चार चौकार लगावले आहेत. यंदाच्या हंगामातील धोनीची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे. दिल्लीविरोधात धोनीने 37 धावांची खेळी केली होती.