MS Dhoni CSK vs LSG IPL 2025: मला अवॉर्ड कशाला?, माझ्यापेक्षा 'त्या' खेळाडूचं जास्त योगदान; सामना जिंकल्यानंतर एमएस धोनी काय म्हणाला?
MS Dhoni CSK vs LSG IPL 2025: दरम्यान सामनावीर म्हणून एमएस धोनीचं नाव जाहीर केल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे.

MS Dhoni CSK vs LSG IPL 2025: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 11 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली आणि 3 चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. आयपीएल 2025 च्या हंगामात चेन्नईचा हा दुसरा विजय आहे. एमएस धोनीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. एमएस धोनीने तब्बल 6 वर्षांनंतर सामनावीरचा पुरस्कार जिंकला. दरम्यान सामनावीर म्हणून एमएस धोनीचं नाव जाहीर केल्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलं आहे.
🚨 MS DHONI BECOMES THE OLDEST PLAYER IN IPL HISTORY TO WIN THE POTM AWARD - 43. 🚨 pic.twitter.com/MHV1Y2TMEN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025
आयपीएलच्या इतिहासात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा एमएस धोनी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. धोनीने 43 वर्षे आणि 60 दिवसांच्या वयात हा पुरस्कार जिंकणाऱ्या प्रवीण तांबेचा विक्रम मोडला. 43 वर्षे 281 दिवसांच्या वयात एमएस धोनीने सामनावीराचा पुरस्कार जिंकला. सामनावीरचा पुरस्कार दिल्यानंतर एमएस धोनी म्हणाला की, मला कशाला सामनावीरचा पुरस्कार देताय, माझ्यापेक्षा फिरकीपटू नूर अहमदने चांगली गोलंदाजी केली. धोनीच्या या प्रतिक्रियेनं पुन्हा एकदा मनं जिंकली आहे.
MS Dhoni said, "I was thinking why I won the POTM award, Noor bowled well".
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025
- MS Dhoni, a legend. 🦁🙇♂️ pic.twitter.com/NdyKTNscEP
एमएस धोनीची आयपीएल कारकीर्द-
एमएस धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 271 सामन्यांमध्ये 5373 धावा केल्या आहेत. धोनीची आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या 84 आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 24 अर्धशतके झळकावली आहेत. तर धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 373 चौकार आणि 260 षटकार टोलावले आहेत.
लखनौविरुद्ध सामना कसा राहिला?
लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने समाधानकारक मजल मारली. पंतने मिचेल मार्शसह 33 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली. आयुष बदोनी, अब्दुल समद यांना मोठी खेळी करता आली नाही, मात्र त्यांनी पंतला चांगली साथ दिली. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 2 बळी घेतले. नूर अहमदला बळी घेता आला नाही, मात्र त्याने 4 षटकांत केवळ 13 धावा देत लखनौला आक्रमकतेपासून रोखले. 167 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली. शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांनी स्फोटक फलंदाजी केली. मात्र, शेख रशीद पाचव्या षटकात बाद झाला. त्याच्या बॅटमधून 27 धावा आल्या. मात्र, रवींद्रची विकेट आठव्या षटकात पडली. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर, पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठीही बाद झाला. जडेजा देखील चमत्कार करू शकला नाही आणि 7 धावा करून बाद झाला. यानंतर, 15 व्या षटकात विजय शंकरही 9 धावा काढून बाद झाला. शेवटच्या 5 षटकांत एमएस धोनी आणि शिवम दुबे यांनी चांगली फलंदाजी केली आणि एलएसजी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. धोनी आणि दुबे यांच्यात 57 धावांची नाबाद भागीदारी झाली, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला सलग पाच पराभवांनंतर विजय मिळाला.





















